

Lightning Tragedy During Monsoon Farming: Farmer Dies Instantly in Field
esakal
-सुनिल पांढरे
पळशी :सिल्लोड तालुक्यातील अंधारी येथील झाडी वस्ती शिवारातील शेतात पेरणीचे काम करत असताना अंगावर वीज पडून एका ६५ वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. सर्जेराव देवराव खराते, असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे.