esakal | कर्जास कंटाळून बीडमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या
sakal

बोलून बातमी शोधा

farmer suicide

कर्जास कंटाळून बीडमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

केज (बीड): शेतीसाठी घेतलेले कर्ज सततच्या नापिकीमुळे फेडायचे कसे? या आर्थिक विवंचनेतून (farmer ended his) एका पन्नास वर्षीय शेतकऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (ता.३) मुंडेवाडी येथे घडली. याप्रकरणी सहा जणांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल (beed police station) करण्यात आला आहे.

तालुक्यातील मुंडेवाडी येथील शेतकरी भास्कर शंकर (वय-५०) या शेतकऱ्याने शेतीसाठी कर्ज घेतले होते. मात्र समाधानकारक उत्पन्न न मिळाल्याने शेतीसाठी घेतलेले कर्ज फेडायचे कसे? या विवंचनेत ते होते. सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घरी एकटेच असताना त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.

हेही वाचा: मराठा आरक्षण रद्द करताना सुप्रीम कोर्ट काय म्हणाले

घटनेची माहिती मिळताच पोलिस नाईक मुकुंद ढाकणे, पोलिस नाईक सानप यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रूग्णालयात पाठवला. याप्रकरणी शेषाबाई भास्कर मुंडे यांनी दिलेल्या माहितीवरून केज पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिस नाईक सानप हे पुढील तपास करीत आहेत.

loading image
go to top