लेकीला डाॅक्टर करण्यासाठी धडपडणाऱ्या शेतकऱ्याचे टोकाचे पाऊल, घेतला गळफास

दहावीला मार्क चांगली पडल्याने मुलगी डॉक्टर व्हावी ही इच्छा असल्याने त्यांनी मुलीला खासगी शिकवणी लावली.
Farmer Suicide News
Farmer Suicide Newsesakal

कळंब (जि.उस्मानाबाद ) : शेतीसाठी बँकेकडून घेतलेल्या पावणेचार लाख रुपयांच्या कर्जाची परतफेड कशी करायची या विवंचनेतून तालुक्यातील इटकुर येथील शेतकरी अविनाश गंभिरे (वय-३६) यांनी रविवारी (ता.२७) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलगी इयता ११ वी मध्ये शिकत आहे. तिला डॉक्टर करण्याचे सप्न होते. त्यासाठी लातूर (Latur) येथे क्लासेस लावण्यात आले होते. शेतीसाठी घेतले कर्ज, शिक्षणासाठी लागणारा पैसे ही चिंता नेहमी सतावत होती. या विवंचनेतून टोकाचे पाऊल उचलण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Farmer Hanged Himself In Kalamb Of Osmanabad)

Farmer Suicide News
Parbhani : जिंतूरमध्ये बोर्डीकर-भांबळे समर्थकांमध्ये तुफान राडा, शहरात तणाव

राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सध्या भ्रष्टाचार वरून घमासान सुरू आहे. सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर आणि विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर केलेल्या आरोपाची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. चर्चा काही ही असली तरी सर्वसामान्य नागरिक, शेतकरी यांच्या समोरची आव्हान वेगळी आहेत. दिवसेंदिवस शेती व्यवसाय संकटात सापडला. पिके घेण्यासाठी लावलेला दामही निघणे कठीण बनले आहे. त्यामुळे प्रापंचिक गरजा, मुलामुलींच्या शिक्षणाचा खर्च कसा भागवयाचा असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. तालुक्यातील इटकुर येथील तरुण शेतकरी अविनाश गंभीरे यानी शेती खर्चासाठी कळंब येथील बँकेकडून तीन लाख रुपये कर्ज घेतले होते. त्याचे व्याजासहित पावणेचार लाख रुपये झाले. जानेवारी अखेर मुद्दल व व्याज असे मिळून भरण्यासाठी बँकेने नोटीस पाठविली होती. (Osmanabad)

Farmer Suicide News
Honda Activa होणार इलेक्ट्रिक स्कूटर? काय असतील फिचर्स

दुसरीकडे यंदा मुलगी अकरावीच्या वर्गात शिकत आहे. दहावीला मार्क चांगली असल्याने अविनाशची मुलगी डॉक्टर व्हावी ही इच्छा असल्याने त्यांनी मुलीला लातूर येथील क्लासेसला एडमिशन घेतले होते. लातूरला बारावीसाठी हॉस्टेल करून मुलीला तेथे ठेवण्यासाठी शनिवारी हॉस्टेलची पाहाणी करून आला असल्याचे त्याचे चुलत बंधू दीपक यांनी सांगितले. बँकेचे कर्ज, मुलीच्या शिक्षणासाठी लागणारा खर्च कसा करायचा या विवंचनेतून टोकाचे पाऊल उचलत रविवारी शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन जीवन संपवले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com