चारा म्हणून दिले मक्‍याचे उभे पीकः पूरग्रस्त भागाला मदत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे हाहाकार माजला असून पुरामुळे अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत. या घटनेत अनेक जनावरांचा मृत्यू झाला असून जिवंत राहिलेल्या जनावरांना चारा मिळत नाही. ही बाब हेरून मुरूड(ता. लातूर) येथील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते शमशोद्दीन दस्तगीर सय्यद मदतीसाठी सरसावले आहेत. त्यांनी आपल्या शेतातील दोन एकरमधील मक्‍याचे पीक ओला चारा म्हणून पूरग्रस्त भागातील जनावरांसाठी दिले आहे. हा चारा पूरग्रस्त भागात पोचवण्यासाठी सरपंच अभयसिंह नाडे यांनी वाहनाची व्यवस्था केली आहे असून सोमवारी (ता. 12) सायंकाळी तो रवाना झाला. 

मुरूड(जि. लातूर)  : सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे हाहाकार माजला असून पुरामुळे अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत. या घटनेत अनेक जनावरांचा मृत्यू झाला असून जिवंत राहिलेल्या जनावरांना चारा मिळत नाही. ही बाब हेरून येथील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते शमशोद्दीन दस्तगीर सय्यद मदतीसाठी सरसावले आहेत.

त्यांनी आपल्या शेतातील दोन एकरमधील मक्‍याचे पीक ओला चारा म्हणून पूरग्रस्त भागातील जनावरांसाठी दिले आहे. हा चारा पूरग्रस्त भागात पोचवण्यासाठी सरपंच अभयसिंह नाडे यांनी वाहनाची व्यवस्था केली आहे असून सोमवारी (ता. 12) सायंकाळी तो रवाना झाला. 

शेतकरी सय्यद यांनी दोन एकरमध्ये मक्‍याचे पेरणी केली होती. उगवणही चांगली झाली आहे. कोल्हापूर, सांगलीतील पूरस्थितीत जनावरांचेही हाल होत असल्याची जाणीव होताच त्यांनी हे पीक चारा म्हणून देण्याची तयारी दाखविली. चारा वाहून नेण्याची त्यांच्याकडे व्यवस्था नव्हती. त्यासाठी सरपंच नाडे यांनी पुढाकार घेतला. मजुरांनी आज मक्‍याची कापणी केली व सायंकाळी हा चारा पूरग्रस्त भागाकडे वाहनाने रवाना झाला. पहिल्या टप्प्यात सहा टन चारा रवाना करण्यात आला असून सय्यद यांच्याकडे दोनशे टन चारा उपलब्ध आहे.

तो पाठविण्याचीही तयारी त्यांनी सुरू केली असून प्रसंगी प्रशासनाकडेही ते मदत मागणार आहेत. दरम्यान, येथील मुस्लिम बांधवांनी साधेपणाने बकरी ईद साजरी करून पूरग्रस्तांसाठी तांदळाचे कट्टे सरपंच नाडे यांच्याकडे सुपूर्द केले.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmer of Murud gave maize crop to feed cattle in flood affected areas