Farmer : उत्पन्न सोडाच लागवडीचा खर्चही निघेना!

सोयाबीन काढणीची लगबग : देवगावफाटा भागातील चित्र
parbhani
parbhanisakal

देवगावफाटा : खरीप हंगामातील सोयाबीन पीक काढणीस शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली. परंतु, यंदा पावसात सातत्य राहिले नसल्यामुळे उत्पन्न सोडाच लागवडीपासून ते काढणीपर्यंतचा निम्मा खर्चही शेतकऱ्यांच्या पदरात पडत नसल्याचे चित्र आहे.

यावर्षी तालुक्यात सर्वात जास्त सोयाबीनची पेरणी झाली आहे. परंतु, यंदा मृग नक्षत्रात पावसाने हजेरी लावून पुन्हा विश्रांती घेतली. दरम्यान, यंदा पावसात सातत्य राहिले नाही. पीक ऐन शेंगा भरण्याच्या अवस्थेत असतानासुद्धा समाधानकारक पाऊस झाली नाही. पुन्हा या कालावधित पिकांवर कीड व विविध रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शेतकऱ्यांना जास्तीचा खर्च करावा लागला.

त्यानंतर काही दिवसांत झालेल्या अतिपावसाने तर या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. काही ठिकाणी फुलोरा आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेतील हे पीक क्षणभरातच उद्ध्वस्त झाले. सध्या शेतात राहिलेले पीक काढणीला सुरुवात झाली. परंतु, उत्पादनात प्रचंड घट येत असून, मोठा तोटा सहन करावा लागत असल्याचे शेतकऱ्यांकडून बोललेले जात आहे. एरव्ही एकरी दहा ते बारा क्विंटल दरम्यान उत्पादन होते.

मात्र, यावर्षी तीन ते चार क्विंटल उत्पादन होत असल्यामुळे निम्मा लागवड खर्चही निघणे कठीण झाले आहे तर बैलजोड्यांचे प्रमाण दिवसेंदिवस कमी झाल्याने आता यंत्राच्या साह्याचा शेतकरी वापर करीत असल्यामुळे मळणीसाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्रालाही लागणाऱ्या इंधन दर वाढीने साहजिकच मळणीच्या दरातही वाढ झाली आहे.

दरात घसरण

संपूर्ण खरीप हंगामात विविध नैसर्गिक आपत्तीचा सामना केल्यानंतर आता उरले-सुरले सोयाबीन काढणीची शेतकरी लगबग करीत आहेत. गतवर्षी सोयाबीनचे दर दहा हजारांवर गेले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या क्षेत्रात यंदा वाढ केली होती. परंतु, सध्या ‘सोयाबीन येताच घरात, घसरण सुरू झाली दरात’ अशी स्थिती दिसून येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com