अंबड तालुक्‍यात शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 एप्रिल 2017

अंबड - अंबड तालुक्‍यातील किनगाव येथील शेतकरी संतोष जनार्दन वाघ (वय 35) यांनी रविवारी (ता. 9) मध्यरात्री शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. वाघ यांच्यावर रोहिलागड येथील युनियन बॅंकेचे दीड लाख रुपयांचे कर्ज होते. त्यांच्याकडे कृषी सेवा केंद्रही होते. मात्र, त्यांचा व्यवसाय आर्थिक अडचणीत सापडला होता. संतोष यांना आर्थिक अडचणीत आणणाऱ्यांचा शोध घ्या, या मागणीसाठी त्यांचे नातेवाईक रात्री उशिरापर्यंत अंबड पोलिस ठाण्यात ठाण मांडून बसले होते.
Web Title: farmer suicide in ambad