बीड जिल्ह्यात शेतकऱ्याची आत्महत्या

बीड जिल्ह्यात शेतकऱ्याची आत्महत्या

माजलगाव - साळेगाव कोथाळा (जि. बीड) येथील कुंडलिक देवराव गवळी (वय 38) या शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.

गवळी यांच्यावर विविध बॅंकांचे जवळपास पाच लाख रुपये कर्ज आहे. दुष्काळामुळे उत्पन्न न झाल्याने कर्ज परतफेडीच्या चिंतेने ते आठ दिवसांपासून तणावात होते, असे नातेवाइकांनी सांगितले. ते सोमवारी (ता. दहा) रात्री शेतात झोपायला गेले. आज सकाळी घरी न आल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला असता, एका झाडाला त्यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com