जिंतूर तालुक्‍यात शेतकरी आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 डिसेंबर 2016

जिंतूर - अकोली (ता. जिंतूर) येथील शेतकरी लक्ष्मण उत्तमराव रोकडे (वय 45) यांनी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (ता.19) सायंकाळी सातच्या सुमारास घडली. त्यांची सहा एकर जमीन असून, सततच्या नापिकीमुळे त्यांनी दोन एकर जमीन विकून कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रयत्न केला. उर्वरित क्षेत्रातही नापिकी व बॅंकेच्या कर्जामुळे ते विवंचनेत होते. त्यातून त्यांनी हे कृत्य केल्याचे सांगण्यात आले. जिंतूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.

Web Title: farmer suicide in jintur