कर्जबाजारी शेतकऱ्याची नांदेडमध्ये आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 मे 2017

नांदेड - सततची नापिकी, दुकानासाठी काढलेल्या कर्जाच्या बोज्यामुळे काकांडी (ता. नांदेड) येथील राहणारे शेतकरी राजू व्यंकटी बागल यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. बागल यांच्या शेतात सतत नापिकी होती. उत्पन्नासाठी जोडधंदा म्हणून दुकानासाठी त्यांनी बॅंक व खासगी वित्त कंपनीकडून कर्ज काढले होते. दुकान चालत नसल्याने ते कर्जबाजारी झाले. शेतातील उत्पन्न व दुकान बंद झाल्याने कर्जाची परतफेड करता येत नसल्याने राहत्या घरात गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली.
Web Title: farmer suicide by loan