पिकाला पाणी देता येत नसल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 डिसेंबर 2016

पाथरी - सततच्या खंडित वीजपुरवठ्यामुळे पिकाला पाणी देता येत नसल्याने त्रस्त झालेल्या तुरा (ता. पाथरी) येथील शेतकरी अश्रोबा रंगनाथ अवचार (वय 45) यांनी रविवारी (ता. 11) कीटकनाशक प्राशन केल्याची माहिती येथे देण्यात आली. त्यांना तत्काळ उपचारासाठी परभणी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

पाथरी तालुक्‍यातील तुरा येथील शेतकरी अश्रोबा रंगनाथ अवचार (वय 45) या शेतकऱ्याने स्वतःच्या दीड एकर शेतातील पिकास पाणी देण्यासाठी दुसऱ्याचा विद्युत पंप आणला होता. परंतु सतत वीजपुरवठा खंडित होत असल्याने पीक भिजवणीस अडचण येत होती. या विवंचनेतच त्यांनी रविवारी (ता.11) रात्री साडेआठच्या सुमारास गावाजवळील शेतात जाऊन विषारी कीटकनाशक प्राशन केले. कुटुंबातील सदस्यांनी ते घरी कसे आले नाहीत म्हणून गावभर शोध घेतला. सापडत नसल्याने शेताकडे धाव घेतली असता अश्रोबा अवचार यांनी विष पिल्याचे आढळून आले. त्यांना सुरवातीला पाथरी आणि त्यानंतर परभणी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले; परंतु रविवारी रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी परभणी येथील शासकीय रुग्णालयात नोंद करण्यात आली आहे.

Web Title: farmer suicide in pathari