औसा येथे विष घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 मे 2018

औसा - लोदगा (ता. औसा) येथील शेतकरी दत्तू नरसिंग डिग्रसे (वय 55) यांनी सोमवारी (ता. 14) सकाळी दहाच्या सुमारास शेतात विष घेतले. लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान दुपारी दोनच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. नापिकी, पडलेले भाजीपाल्याचे भाव, मुलींच्या लग्नात झालेला कर्जाचा डोंगर या विवंचेनतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. त्यांची पत्नी जेवण घेऊन शेतात गेली असता दत्तू डिग्रसे त्यांना बेशुद्धावस्थेत दिसले. त्यानंतर डिग्रसे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Web Title: farmer suicide poison