हिंगोली, नांदेड जिल्ह्यात दोन शेतकरी आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 मे 2019

भाटेगाव (ता. कळमनुरी, जि. हिंगोली) येथील शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना रविवारी घडली. जयसिंग उल्हास राठोड (वय 26) असे त्यांचे नाव आहे. सततच्या नापिकीमुळे बॅंक, खासगी कर्ज कसे फेडावे, या विवंचनेतून त्यांनी विहिरीवरील वीजपंपाच्या स्टार्टरला स्पर्श करून आत्महत्या केली.

हिंगोली, नांदेड - भाटेगाव (ता. कळमनुरी, जि. हिंगोली) येथील शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना रविवारी घडली. जयसिंग उल्हास राठोड (वय 26) असे त्यांचे नाव आहे. सततच्या नापिकीमुळे बॅंक, खासगी कर्ज कसे फेडावे, या विवंचनेतून त्यांनी विहिरीवरील वीजपंपाच्या स्टार्टरला स्पर्श करून आत्महत्या केली. आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली. राठोड यांच्या मागे आई, दोन भाऊ, बहीण, पत्नी, आठ महिन्यांचा मुलगा असा परिवार आहे. दरम्यान नापिकी, कर्जामुळे घरखर्च कसा चालवायचा, या विवंचनेतून खरटवाडी (ता. हदगाव, जि. नांदेड) येथील शेतकरी विलास रंगराव शेबेटवाड (वय 30) यांनी काल दुपारी विष घेतले. नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer Suicide Poison