लोहा तालुक्यात कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या 

लोहा तालुक्यात कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या 

नांदेड, ता. ९ : सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने किटक नाशक प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना सावरगाव नसरत (ता. लोहा) येथे रविवारी (ता. सात) दुपारी दीडच्या सुमारास घडली. 

जिल्ह्यात कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्या काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाहीत. त्यातच जिल्ह्यातील लोहा तालुक्यात नेहमीच कोरड्या दुष्काळाची परिस्थीती राहते. या भागात पावसाचे प्रमाण अल्प असल्याने तसेच जमीनी हलक्या दर्जाच्या असल्याने अनेक वेळा शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास निसर्ग हिरावून घेतो. आहे त्या शेतीवर प्रपंच चालविणाऱ्या शेतकऱ्यांना लहरी निर्सगाच्या प्रकोपाचा नेहमीच सामना करावा लागतो. यावर्षीही पावसाचे प्रमाण पाहिजे असे झाले नाही. त्यामुळे अनेक शेतावर पीके सुरवातीलाच कोमेजून गेली. यातच अगोदरच कर्जबाजारी झालेले शेतकरी किशनराव कदम यांच्यावर लोहा शाखेच्या देना बँकेचे कर्ज होते. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले शेतकरी किशनराव कदम (वय ५६) यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. सततच्या नापीकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी आपल्या शेतावर जाऊन रविवारी दुपारी किटक नाशक प्राशन केले. नातेवाईकांनी त्यांना नांदेडच्या शासकिय रूग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. गोविंद किशनराव कदम यांच्या माहितीवरुन माळाकोळी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास फौजदार श्री. होळकर हे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com