पावसाचा ब्रेक; पण शेतीकामाला गती : पहा Video

वसंत काळवणे
Tuesday, 23 June 2020

अंबड तालुक्यातील रोहिलागड परिसरात पावसाने चार ते पाच दिवसांपासून उघाड दिल्याने बाजरी, मूग, मका पेरणी शेतकऱ्यांनी थांबविल्या आहेत. मृगनक्षत्रात सुरवातीला चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी कपाशी लागवडीला प्राधान्य दिले; मात्र आर्द्रा नक्षत्रातही पावसाने ब्रेक घेतल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची कामे तूर्तास थांबविली आहेत. 

रोहिलागड (जि.जालना) - अंबड तालुक्यातील रोहिलागड परिसरात पावसाने चार ते पाच दिवसांपासून उघाड दिल्याने बाजरी, मूग, मका पेरणी शेतकऱ्यांनी थांबविल्या आहेत. मृगनक्षत्रात सुरवातीला चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी कपाशी लागवडीला प्राधान्य दिले; मात्र आर्द्रा नक्षत्रातही पावसाने ब्रेक घेतल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची कामे तूर्तास थांबविली आहेत. 

रोहिलागड, किनगाव परिसरात सध्या कापूस, तूर पिकांची खुरपणी, वखरणी, कोळपणी; तसेच पिकांना खते देणे, फवारणी करणे ही कामे करताना शेतकरी दिसत आहेत.

हेही वाचा : पीककर्जावर शेतकऱ्यांची मदार

गतवर्षीच्या कापसाला देखील भाव मिळाला नाही. त्यातच कोरोनामुळे अनेकांचा कापूस घरातच राहिला. फळपिकांना देखील योग्य भाव मिळाला नसल्याने शेतकरी चांगलेच आर्थिक अडचणीत सापडले आहे.

हेही वाचा : कसे रुजावे बियाणे...

कापसाला योग्य भाव मिळालेला नसला तरी खडकाळ, मुरमाड, डोंगराळ भाग असल्याने शेतकऱ्यांसमोर पर्याय नाही. त्यामुळे यावर्षी देखील मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड करीत आहेत. 

किनगाव परिसरात यंदा चांगला पाऊस झाल्याने चांगले पीक येईल, या आशेने पुन्हा कपाशी लागवड केली आहे. मागील वर्षी कोरोनामुळे भाव मिळाला नव्हता; मात्र यावर्षी चांगला भाव मिळेल, अशी आशा आहे. 
- सतीश वाघ, युवा शेतकरी 

पावसाने यावर्षी प्रारंभी चांगली हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी खरीप हंगामाबाबत मोठ्या आशा आहेत. पुढील काळातही चांगली बरसात होईल व चांगले पीक येईल असे वाटते. या भागात कपाशीशिवाय दुसरे पीक घेता येत नाही. कोरोनामुळे यंदा अडचणही झालेला आहे. कपाशीला यंदा चांगला भाव मिळण्याची अपेक्षा आहे. 
- बद्रीनाथ भोजने, शेतकरी 

सध्या पावसाने उघाड दिल्याने नांदी परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या थांबविल्या आहेत. शेतात वखरणी, खुरपणी, खते देणे ही कामे करून घेत आहोत. 
- बळीराम गायकवाड, शेतकरी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer waiting for rain