रात्रीतून झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी सुखावला

गंगाधर डांगे
शनिवार, 20 जुलै 2019

मुदखेड (नांदेड) : मुदखेड शहरासह संपूर्ण तालुक्यात पावसाची रात्रीपासून संततधार सुरु झाली आहे. आकाशात ढग भरून असल्यामुळे काही तासातच पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वाटते.

पावसामुळे सकाळी सकाळी फिरायला जानाऱ्या नागरीकांची संख्या तुरळक होती आज वातावरण असेच राहिले तर शाळेतील विद्यार्थ्यांची संख्याही कमी असेल. या पडणाऱ्या पावसामुळे मात्र शेतकरी मोठा आनंदित झाला आहे.

तालुक्यात 50% पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. काल सर्वत्र भिज पाऊस पडल्याने उर्वरीत शेतकऱ्यांनी दोन दिवस पेरणी करूण जोखीम उचलली. शेतकऱ्यांच्या मदतीला आज वरुण राजा धाऊन आला रात्री पासूनच पाऊस चालू झाल्याने शेतामध्ये पाणीही साचलेले दिसून येत आहे. दोन महिन्यांपासून पाऊस गसल्याने बळीराजाचे डोळे पाणावलेले दिसत होते. आता मात्र या पावसाने बळी राजाच्या डोळ्यात आनंदाश्रु मावेनासे झाल आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmers are happy due to rain at Nanded