ऊन-वारा झेलत बीड जिल्ह्यातील शेतकरी कामात मग्न 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 8 June 2020

ऊन-वारा झेलत शेतकरी सध्या शेतीच्या मशागत कामात मग्न आहेत. शेतकरी सर्व दुःख बाजूला सारून यावर्षी निसर्ग आपल्याला साथ देईल म्हणून रखरखत्या उन्हात शेतीची मशागत जोमाने करू लागला आहे. 

गेवराई (जि. बीड) - पावसाळ्याच्या सुरवातीला बळिराजाला शेतीची मशागत करणे आवश्यक असते. ऊन-वारा झेलत शेतकरी सध्या शेतीच्या मशागत कामात मग्न आहेत. शेतकरी सर्व दुःख बाजूला सारून यावर्षी निसर्ग आपल्याला साथ देईल म्हणून रखरखत्या उन्हात शेतीची मशागत जोमाने करू लागला आहे. 

काही वर्षांपासून शेतकऱ्यांना विविध संकटांचा सामना करावा लागत आहे. कधी अवकाळी पाऊस, तरी कधी दुष्काळाचा सामना करीत शेतकरी शेतीत कष्ट करीत आहे. आज कोणत्याही ऋतूमध्ये कधी उन्हाळ्यात, तर कधी पावसाळ्यात अवकाळी पाऊस पडत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पदरात काहीच येत नाही.

हेही वाचा - मेडिकलच्या आगीत डॉक्टरचा जळून मृत्यू

यंदा खरीप हंगामासाठी शेतीची पूर्वमशागत कामाला लागले आहेत. सकाळीच शेतात गेलेला शेतकरी संध्याकाळी अपार कष्ट करून घरी येतो. दिवसभर भरउन्हात उन्हाचे चटके झेलत शेतीच्या पूर्वमशागतीच्या कामात मग्न दिसून येत आहे. यंदा हवामान खात्याने बऱ्यापैकी पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे शेतकरी खरीप हंगामातील पेरणीपूर्व मशागत करण्यात मग्न असल्याचे दिसून येत आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers in Beed district are engrossed in work