कापशीला शेतकऱ्यांनी बांधली राखी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

सर्वत्र बहीण भावाला राखी बांधत असताना अर्धापूर तालुक्यातील शेतकरी कुटुंबाने कापसाच्या पिकाला राखी बांधली. आपल्या संरक्षणाची जबाबदारी पिकांची असल्याचे शेतकरी महिलांनी सांगितले.
 

मालेगाव (नांदेड)- सर्वत्र बहीण भावाला राखी बांधत असताना अर्धापूर तालुक्यातील शेतकरी कुटुंबाने कापसाच्या पिकाला राखी बांधली. आपल्या संरक्षणाची जबाबदारी पिकांची असल्याचे शेतकरी महिलांनी सांगितले.

सध्या सर्वत्र कपाशीवर गुलाबी बोंडआळीचे सावट आहे. त्यामुळे कपाशीचे पीक धोक्यात आले आहे. शासनाकडेही शेतकऱ्यांसाठी योग्य नियोजन नसल्याचे लक्षात घेता आपल्या कुंकवाचे रक्षण फक्त शेतातील पिकच करू शकते, या भावनेने मालेगाव येथील शेतकरी महिलांनी रक्षाबंधनाचे औचित्य साधत कपाशी पिकाला राखी बांधून भरभराटीने वाढण्याचे साकडे घातले.

कपाशी हे नागदी पीक असल्याने शेतकऱ्याला या पिकाचे तात्काळ पैसे उपलब्ध होतात, त्यामुळे यंदा भरपूर कपास होऊ दे अशी विनवणी महिला शेतकरी करत आहेत.

Web Title: farmers celebrates rakhi with cotton