esakal | सेनगाव तालुक्यात होडीवरून पीक गोळा करण्याची शेतकऱ्यांवर वेळ | Hingoli Farmers
sakal

बोलून बातमी शोधा

सेनगाव (जि.हिंगोली) : सेनगाव तालुक्यात  झालेल्या अतिवृष्टीने सोयाबीन पिकात पावसाचे पाणी जमा झाल्याने होडीवरून पीक गोळा करण्याची शेतकऱ्यांवर वेळ आली आहे.

सेनगाव तालुक्यात होडीवरून पीक गोळा करण्याची शेतकऱ्यांवर वेळ

sakal_logo
By
विठ्ठल देशमुख

सेनगाव (जि.हिंगोली) : सेनगाव (Sengaon) तालुक्यातील झालेल्या अतिवृष्टीने सोयाबीन पिकात पावसाचे व धरणाचे पाणी जमा झाल्याने होडीवरून पीक गोळा करण्याची शेतकऱ्यांवर वेळ आली आहे. तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी पालकमंत्र्याना वेळ मिळत नाही का असा सवाल आता शेतकरी उपस्थित करीत आहेत. तर अधिकारी मात्र कागदी घोडे नाचवण्यातच दंग (Farmers In Trouble) असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. मागच्या आठवड्यातील सतत सुरू असलेल्या आठ दिवसाच्या (Hingoli) पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले आहे. परंतु अधिकारी केवळ कागदोपत्री पाहणी करून शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळत असल्याचा प्रकार सुरू आहे.

हेही वाचा: जालन्यातून चोरी, चोरटे भोकरदन पोलिसांच्या जाळ्यात

तसेच जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी देखील मुंबईतून अधिकाऱ्यांच्या ऑनलाईन नुकसानीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरवले. सेनगाव तालुक्यासह जिल्हा भरात नुकसान झाले असता. प्रशासन केवळ कागदोपत्रीच पाहणी करून वरिष्ठांना अहवाल सादर केला जात आहे. तालुक्यातील धानोरा बंजारा, उटी पूर्णा, बन, बरडा आदीसह पूर्णा नदी काठच्या शेत जमिनी खरडून निघाल्या आहेत. सेनगाव तालुक्यात बन, बरडा पिंपरी परिसरात गायकवाड कुटुंब होडीवरून पीक सोयाबीन गोळा करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पिंपरी गावचे शेतकरी राजू गायकवाड यांना वारसाहक्काने मिळालेल्या पाच एकर शेती असून ते आणि त्यांचा भाऊ दयानंद गायकवाड यांनी या शेतीत सोयाबीनमध्ये आंतरपीक म्हणून तुरीची लागवड केली होती. पण सततचा पाऊस आणि धरणाच्या अनागोंदी कारभाराने गायकवाड यांच्या शेतात तलाव निर्माण झाला. यामुळे त्यांचं अडीच लाखांच नुकसान झालं आहे.

येलदरी धरणाच्या ऊर्ध्व भागात ही पाऊस होत होता. पण धरण प्रशासनाने वेळेत पाणी न सोडल्याने आमच्या शेतात तलाव निर्माण होऊन सोयाबीन व तूर पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे या धरणाच्या अभियंत्यांवर गुन्हे दाखल करून सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी.

- राजू गायकवाड , शेतकरी, पिंपरी

loading image
go to top