esakal | जालन्यातून चोरी, चोरटे भोकरदन पोलिसांच्या जाळ्यात | Jalna News
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

जालन्यातून चोरी, चोरटे भोकरदन पोलिसांच्या जाळ्यात

sakal_logo
By
दीपक सोळंके

भोकरदन (जि.जालना) : जालना (Jalna) येथे जबरी चोरी करून पसार झालेले दोन चोरटे गुरुवारी (ता.30) भोकरदन पोलिसांच्या जाळ्यात सापडले. त्यांच्याकडून 5 लाख 89 हजार 190 रोख, तर लाख रुपयांच्या रोख रकमेसह 3 लाख 77 हजार 609 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने मिळुन आले. शहरातील नवे भोकरदन (Bhokardan) भागातील समातनगर परिसरात दोन जण संशयितरित्या फिरत असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक रत्नदीप जोगदंड यांना मिळाली होती. त्यानुसार श्री.जोगदंड यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी इंदलसिंग बहुरे यांना माहिती देत सहायक पोलिस निरीक्षक राजाराम तडवी, पोलिस नाईक अभिजित वायकोस, पोलिस कर्मचारी समाधान जगताप (Crime In Jalna) यांना सदर ठिकाणी पाठवले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत ठाण्यात आणले व नाव विचारले असता त्यांनी शेख आमेर शेख रमजानी (रा. मिल्लत नगर, जालना) व समीर सय्यद जावेद (रा. माळीपुरा, जालना) असे असल्याचे सांगितले.

हेही वाचा: बावीस वर्ष झाले, झोपडपट्टीधारकांना हक्काच्या जागा मिळेना!

पोलिसांनी त्यांना आणखी विचारपुस केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. म्हणुन त्यांच्या बॅगची पाहणी केली असता त्यात 5 लाख 89 हजार 190 रोख तर लाख रुपयांच्या रोख रकमेसह 3 लाख 77 हजार 609 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने मिळुन आले. याबाबत दोघांकडे विचारपूस केली. मात्र, त्यांनी समाधानकारक माहीती न दिल्याने त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी सदर रोख रक्कम व सोन्या चांदीचे दागीने जालना येथुन एक घरातुन बुधवारी (ता.29) रोजी दिवसा घरफोडी करुन चोरी केले असल्याचे कबुल केले. चोरी केल्यावर औरंगाबादला व नंतर रात्री भोकरदनला आल्याचे पोलिसांना सांगितले. या चोरी प्रकरणी जालना कदीम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला असून मिळुन संशयित व त्यांच्या ताब्यातील चोरीचा माल कदीम जालना येथे पुढील तपासकामी दाखल करण्याची प्रक्रीया सुरु असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक रत्नदीप जोगदंड यांनी सांगितले.

हेही वाचा: अतिवृष्टीने मराठवाड्यात ८४५ कोटींचे नुकसान

loading image
go to top