शेतकरी कुटुंबातील अश्‍विनीची भरारी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

बारड (ता. मुदखेड) - येथील अश्‍विनी धोंडिबा आठवले हिने ओरल मेडिसीन अॅण्ड रेडिओलाॅजी या कठीण विषयात राज्यातून प्रथम येण्याचा बहुमान मिळवला असल्याने सुवर्णपदक बहाल करण्यात आले असून, वैद्यकीय क्षेत्रात गुणवत्तेचा ठसा उमटवून जिल्ह्याचा नावलौकिक केला आहे.

ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या प्रवर्गातील अश्‍विनी धोंडिबा आठवले हिने डाॅक्टर बनण्याचा दृढ निश्‍चय केला होता. मुंबई येथील शासकीय डेंटल काॅलेजमध्ये प्रवेश मिळावून तिने बीडीएस पदवी संपादित केली आहे. महाराष्ट्र राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकअंतर्गत दरवर्षी दंतरोग महाविद्यालयाअंतर्गत कठीण विषयात राज्यातून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल प्रदान केले जाते. 

या वर्षीच्या सुवर्णपदकासाठी तीन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. शेवटच्या वर्षात ओरल मेडिसीन अॅण्ड रेडिओलाॅजी या विषयात राज्यातील सर्व दंतरोग काॅलेजमधून गुण मिळवून अश्‍विनी आठवले हिते प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे. 

भारतीय केंद्रीय चिकित्सा परिषद अध्यक्ष वैद्य जयंत देवपुजारी यांच्या हस्ते सुवर्णपदक, सन्मानपत्र देऊन डाॅ. अश्‍विनी धोंडिबा आठवले हिचा गौरव करण्यात आला आहे. नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गरीब शेतकरी कुटुंबातील डाॅ. अश्‍विनी आठवले हिला सुवर्णपदक मिळाल्याने सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

Web Title: Farmers family Ashwini athawale