पिके उपटून टाकली; मग केंद्राचे पथक काय ढेकळाची पाहणी करणार?

राजेभाऊ मोगल
मंगळवार, 15 मे 2018

औरंगाबाद - खरीप हंगामात कापूस, धान पिकांवर झालेल्या किडीच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पिकाने डोळ्यात पाणी आणल्यानंतर शेतकऱ्यांनी कापसासह अन्य पिके काढून टाकली. या नुकसानीबद्दल मदत करण्याचा निर्णयही शासनाने मार्चमध्ये घेतला. त्यानंतर बुधवारपासून (ता. 16) केंद्राचे पथक पाहणी करणार आहे. विशेष म्हणजे शेतात आता पीकच नाहीत, मग हे पथक काय ढेकळाची पाहणी करणार, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. 

अन्नदाता असलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांकडे राज्यकर्त्यांसह प्रशासनही डोळेझाक करीत असल्याचे अनेक प्रकार समोर आलेले आहेत. यावर्षी पांढरे सोने म्हणून ओळख असलेल्या कपाशीसह अन्य पिकांवरही मोठ्या प्रमाणात रोगांचा प्रादूर्भाव पडला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी खर्चही पडला नाही. हा प्रश्‍न विधीमंडळाच्या अधिवेशनातही गाजला. त्यानंतर 14 मार्चला शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासन मदत करेल, असा निर्णय घेतला. प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हाती मदत पडलेली नाही. त्यातच आता केंद्र सरकारकडून मदत मिळविण्यासाठी मंगळवारी केंद्राचे पथक दौऱ्यावर येत आहे. बुधवारी व गुरुवारी या दोन दिवसांमध्ये हे पथक मराठवाडाभर फिरून पाहणी करणार आहे. खरिपाची पिके काढून टाकल्यानंतर रब्बीचीही पिके आता शिल्लक राहिलेली नाहीत. विशेष म्हणजे अनेक ठिकाणी शेतकरी खरिपाची तयारीला लागले आहेत. असे असताना हे पथक येऊन काय पाहणी करेल, असा प्रश्‍न शेतकऱ्यांतून उपस्थित केला जात आहे.

Web Title: farmers Large losses due to insect pest attack on crops