esakal | पिकांचे नुकसानामुळे औंढा-जिंतूर रस्त्यावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको | Farmer Protest In Hingoli
sakal

बोलून बातमी शोधा

औंढा नागनाथ (जि.हिंगोली) : तालुक्यातील सिद्धेश्वर धरणातील पाणी पूर्णा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात सोडल्यामुळे पुराचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गेले. पिकामध्ये  पाणी साचल्याने पिकांचे नुकसान झाले. त्याचे पंचनामे करून शेतकऱ्याला आर्थिक मदत मिळावी.

पिकांचे नुकसानामुळे औंढा-जिंतूर रस्त्यावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औंढा नागनाथ (जि.हिंगोली) : तालुक्यातील सिद्धेश्वर धरणातील (Siddheshwar Dam) पाणी पूर्णा नदीपात्रात (Purna River) मोठ्या प्रमाणात सोडल्यामुळे पुराचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गेले. पिकामध्ये पाणी साचल्याने पिकांचे नुकसान झाले. त्याचे पंचनामे करून शेतकऱ्याला आर्थिक मदत मिळावी. यासाठी औंढा-जिंतुर रस्त्यावर धारफाट्यावर शेतकऱ्यांनी मंगळवारी (ता.पाच) एक तास रस्ता रोको आंदोलन केले. यामुळे मार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. सिध्देश्वर धरणाच्या (Hingoli) पाण्यामुळे रूपुर, धार, माथा, चिमेगाव भगवा,अनखळी, पेरजाबाद, बेरुळा, पोटा बुद्रुक, टाकळगव्हाण येथील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज सकाळी ११ वाजता औंढा-जिंतूर रस्त्यावर धार फाट्यावर रस्ता रोको करण्यात आला होता. शेतकऱ्याला (Farmer Protest) विनाअट सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडुन करण्यात आली.

हेही वाचा: पायी गावाकडे निघालेल्या मजुराची वाहनाच्या धडकेत मृत्यू

या रास्ता रोकोत शेतकरी साहेबराव चव्हाण, प्रकाश चव्हाण, देविदास सांगळे पंडित चव्हाण, नामदेव सांगळे, श्रीराम राठोड , ज्ञानदेव गीते, भगवान सांगळे, धर्मा चव्हाण, बंडू घुगे ,मुरलीधर नागरे, प्रदीप राठोड ,बंडू सांगळे, खंडू घुगे आदी शेतकरी या रास्ता रोको मध्ये सहभागी होते. या वेळी पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे, पोलिस उपनिरीक्षक सुवर्णा वाळके, जमादार संदीप टाक, अमोल चव्हाण, ओंकारेश्वर राजनेकर, रवि इंगोले ,राजकुमार सुर्वे, राहुल मोगले कडक बंदोबस्त दिला होता. केशवराव अंभोरे, भगवान घुगे मडळ अधिकारी संदीप डोंगरे यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले.

loading image
go to top