अंबड - जालना अंबड तहसिल कार्यालयावर शेतकऱ्यानी त्यांच्या न्याय हक्कांसाठी मंगळवारी (ता. 23) शहरातील मत्स्योदरी देवी मंदिरापासुन शेतकऱ्याच्या विविध मागण्यासाठी 'बोंब मारो मोर्चा' काढण्यात आला होता..हा मोर्चा जालना-बिड महामार्गावरून मत्स्योदरी देवी मंदिरापासुन शेतकऱ्यानी सरकारच्या वतीने बोंब मारो करत पंचायत समिती, मोंढा, महावीर चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडर पुतळा, बसस्थानक ते तहसिल कार्यालयावर हा शेतकऱ्यांचा 'बोंब मारो मोर्चा' धडकला.शेतकऱ्यानी गळ्यात मोसंबी फळांच्या माळा, कपाशीची सडलेली बोंड, सोयाबीनच्या पाण्यात भिजून शेंगांचे झालेले नुकसान घेऊन तहसिलदार यांना शेतकऱ्यांची झालेली दुरावस्था झाल्याचे विदारक मोर्चा करणी चित्र मांडले. तहसिलदार विजय चव्हाण यांना दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले की, अंबड तालुक्यात सतत होणाऱ्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याच्या खरीप पिकं व फळंबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे..अंबड तालुका ओला दुष्काळ जाहीर करा. शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी करा, कुठलाही निकष न लावता शेतकऱ्याच्या मुलाची सरसकट शैक्षणिक ही फिस माफ करा, सन 2018 मंजूर असलेल्या खरीप पिक विमा रक्कम शेतकऱ्यांना वाटप करा, इ. पीक पाहणी करण्यास शेतकऱ्यांना अडचणी येत असून पिक पाहणी ऑफलाइन करण्यात यावी..फार्मर आयडी प्रलंबित प्रकरणी निकाली काढा, नदी व नाल्याजवळील व पाणलोट क्षेत्राखालील माती खरडून गेलेल्या मालकांना नैसर्गिक आपत्ती पुनर्वसन कायद्याप्रमाणे नुकसान भरपाई द्यावी, पीएम किसान योजनेतील लँड सिडींग प्रकरणे तात्काळ निकाली काढून पीएम किसान शेतकरी नोंदणी पोर्टल सुरू करावी, पिक विमा कंपनीचे तालुका स्तरावर कायमस्वरूपी कार्यालय सुरू करावे, शेतात राहणाऱ्या शेतकऱ्यांना रात्रीची लाईट कायमस्वरूपी उपलब्ध करून द्यावी, अतिवृष्टीमुळे चारा नुकसान झालेल्या पशुपालकांना चाऱ्यासाठी अतिरिक्त आर्थिक मदत करावी. यासह आदी मागण्यांचे लेखी निवेदन देण्यात आले आहे..त्याप्रसंगी प्रकाश बोरडे, शरद सोळुंके, गजानन उगले, भैय्यासाहेब हातोटे काळे, प्रल्हाद जाधव, हनुमान धाडे, किरण तारख, कैलास जिगे, भाऊसाहेब मस्के, राम काळे, परमेश्वर काळबांडे, पांडुरंग डेंगळेसह आदींची उपस्थिती होती.शेतकऱ्यानी बोंब मारत तहसिल कार्यालयावर मंगळवारी मोर्चा काढला. या मोर्चात तालुक्यातील दोन ते अडीच हजार शेतकरी या 'बोंब मारो मोर्चा'त सहभागी झाले होते..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.