esakal | शेतकऱ्यांना डिजिटल शेतीसाठी प्रोत्साहित करावे ; कोण म्हणाले वाचा...
sakal

बोलून बातमी शोधा

vishwanatha.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि जागतिक बँक पुरस्कृत राष्ट्रीय कृषी उच्य शिक्षण प्रकल्प (नाहेप), भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने (ता.२९) जून ते तीन जुलै दरम्‍यान आयोजित डिजिटल साधनांच्या माध्यमातून पिकांचे अजैविक ताण व्यवस्थापन या विषयावरील ऑनलाइन प्रशिक्षणाचा समारोप (ता.तीन) जुलैला कुलगुरू डॉ. अशोक ढवण अध्‍यक्षतेखाली झाला. यामध्ये सहभागी शास्त्रज्ञांनी विविध विषयांवर विचारमंथन केले. 

शेतकऱ्यांना डिजिटल शेतीसाठी प्रोत्साहित करावे ; कोण म्हणाले वाचा...

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी : विविध विषयातील शास्त्रज्ञांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांसाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग करुन अजैविक ताण सहन करणाऱ्या वाणांची निर्मिती करण्याचा प्रयत्न करावा. तसेच शास्त्रज्ञांनी नवनिर्मित संशोधन करुन शेतकऱ्यांना डिजिटल शेती करण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगूरू डॉ के.पी.विश्वनाथा यांनी शुक्रवारी (ता.तीन) केले. 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि जागतिक बँक पुरस्कृत राष्ट्रीय कृषी उच्य शिक्षण प्रकल्प (नाहेप), भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने (ता.२९) जून ते तीन जुलै दरम्‍यान आयोजित डिजिटल साधनांच्या माध्यमातून पिकांचे अजैविक ताण व्यवस्थापन या विषयावरील ऑनलाइन प्रशिक्षणाचा समारोप (ता.तीन) जुलैला कुलगुरू डॉ. अशोक ढवण अध्‍यक्षतेखाली झाला. 

हेही वाचा - आहे त्या परिस्थितीत जगायला शिका, कोण म्हणाले ते वाचा...

एकूण ५०० प्रशिक्षणार्थी सहभागी 
पाच दिवसीय प्रशिक्षणात ऑस्ट्रेलिया येथील वेस्टर्न युनिव्हर्सीटीचे संचालक प्रा. कदमबोट सिद्धीक, अमेरिका येथील कान्स स्टेट युनिव्हर्सीटीचे डॉ. पी. व्ही. वरप्रसाद, अमेरिकास्थित भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे माजी विभागप्रमुख डॉ पी. एस. देशमुख, केरळ येथील सीपीसीआरआयचे निवृत्त संचालक डॉ. वेलामुर राजगोपाल, भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली येथील डॉ. व्ही. चीन्नुस्वामी, विभाग प्रमुख, वनस्पती शरीरक्रियाशास्त्र व आनुवंशिकी विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सी. भारव्दाज, हैद्राबाद येथील केंद्रीय कोरडवाहु शेती संशोधन संस्थेचे डॉ. एम. माहेश्वरी, युनिव्हरसीटी ऑफ इलीनीऑस (अमेरिका) चे शास्‍त्रज्ञ डॉ. नितीन कदम, डॉ.पुसा (बिहार) येथील राजेंद्र प्रसाद केंद्रीय कृषी विद्यापिठाचे डॉ.राजीव बहुगुना, जपान येथील वरिष्ठ संशोधक डॉ. व्ही. देशमुख आदींनी विविध विषयावर मार्गदर्शन करुन प्रशिक्षण घेणाऱ्याचे शंकानिरण केले. प्रशिक्षणात भारत, अमेरिका, जपान, ब्राझील, नेपाळ, पाकिस्तान, पोर्तुगाल, फिलिपिन्स, व्हींतनाम, नायजेरिया व अन्य देश येथून कृषी शास्त्राशी निगडित संशोधक, प्राध्यापक व आचार्य विद्यार्थी असे एकूण ५०० प्रशिक्षणार्थी सहभागी होते. 

हेही वाचा - माहूर गड : श्री दत्त शिखर संस्थान येथे गुरू पोर्णिमा -

प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षणाबाबत मनोगत मांडले  
प्रशिक्षाण सहभागी प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षणाबाबत आपले मनोगत व्‍यक्‍त केले. प्रमुख अन्वेषक डॉ. गोपाळ शिंदे यांनी नाहेप प्रकल्पाबाबत माहिती दिली तर कार्यक्रम सचिव डॉ. गोदावरी पवार यांनी प्रशिक्षणाचा आढावा सादर केला. सूत्रसंचालन डॉ. रश्मी बंगाळे यांनी तर विस्तार शिक्षण विभागाचे विभाग प्रमुख डॉ. राजेश कदम यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी शैलेश शिंदे, डॉ.हेमंत रोकडे, रहिम खान, डॉ.स्वाती मुंडे, गोपाळ रनेर, जगदीश माने आदींनी परिश्रम घेतले.

 

loading image