कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016

अंधारी - सिल्लोड तालुक्‍यातील मांडगाव येथील तरुण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून रविवारी (ता.13) दुपारी दोनच्या सुमारास आत्महत्या केली. अंबादास गंजीधर जाधव (वय 27) असे मृताचे नाव आहे. 

अंबादासने स्वत:च्या घरात विषारी कीटकनाशक प्राशन केले. त्यांना दोन एकर कोरडवाहू शेती आहे. दोन वर्षांत शेतीतून उत्पन्न निघाले नाही. सावकारी व सेवा संस्थेचे काही कर्ज काढून गेल्यावर्षी त्यांनी दोन बहिणींचा विवाह केला. नापिकीमुळे ते चिंतेत होते. वडील अशिक्षित असल्यामुळे आर्थिक व्यवहार अंबादास जाधव हेच बघायचे. त्यांच्यामागे आई, वडील, दोन बहिणी व एक लहान भाऊ, असा परिवार आहे. 

Web Title: farmers suicides