
प्रशासनाने खुला केलेली गाडीवाट काही जणांनी बंद केली.त्यामुळे ही गाडीवाट सुरु करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्याने जनावरांसह उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे.
परळी वैजनाथ (जि.बीड) : प्रशासनाने खुला केलेली गाडीवाट काही जणांनी बंद केली.त्यामुळे ही गाडीवाट सुरु करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्याने जनावरांसह उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे. तालुक्यातील देशमुख टाकळी येथे तहसीलदार यांनी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार शेतीमशागत, शेतमाल वाहतूक करण्यासाठी बैलगाडी रस्ता खुला करुन दिलेला आहे.
त्या बैलगाडी रस्त्यावर काहीजणांनी बैलगाडी रस्ता अडवून काट्या कुपाटया टाकल्या आहेत. मात्र तक्रार देवूनही महसूल व पोलीस प्रशासनाने कारवाई केली नाही, गुरुवार पासून, शेतकरी बालासाहेब जनार्धन शिंदे, प्रल्हाद रामकृष्ण शिंदे, अवधूत जनार्धन शिंदे, गोविंद श्रीराम शिंदे, परमेश्वर श्रीराम शिंदे, गणेश दत्तात्रय शिंदे, चंद्रकला प्रल्हाद शिंदे, चंद्रकला बालासाहेब शिंदे, अयोध्या परमेश्वर शिंदे यांनी मुलाबाळांसह तसेच जनावरांसह बेमुदत सुरू केले आहे.
Edited - Ganesh Pitekar