शेतकऱ्यांना मिळणार सोडतीने हरभरा बियाणे, कृषी विभागाकडून याद्या तयार करणे सुरु

राम काळगे
Saturday, 24 October 2020

यंदाच्या रब्बी हंगामातील पेरणीसाठी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना हरभरा पिकाचे बियाणे सोडत पद्धतीने मिळणार आहे. बियाणासाठी कोणाची लॉटरी लागणार त्यांनाच बियाणे मिळणार असल्याने कृषी विभागाकडून गावातील शेतकऱ्यांच्या याद्या तयार करणे सुरू आहे.

निलंगा (जि.लातूर) : यंदाच्या रब्बी हंगामातील पेरणीसाठी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना हरभरा पिकाचे बियाणे सोडत पद्धतीने मिळणार आहे. बियाणासाठी कोणाची लॉटरी लागणार त्यांनाच बियाणे मिळणार असल्याने कृषी विभागाकडून गावातील शेतकऱ्यांच्या याद्या तयार करणे सुरू आहे.रब्बी हंगामासाठी दरवर्षी अन्नसुरक्षा अभियानात शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील विविध पिकांचे बियाणे कृषी विभागाकडून सवलतीच्या दरामध्ये दिले जाते.

नुकसान भरपाईसाठी औरंगाबाद जिल्‍ह्यात लागणार १९२ कोटी, चार लाख हेक्टरवरील पिकांना पावसाचा फटका

यापूर्वी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्पभूधारक, अत्यल्प भूधारक या शेतकऱ्यांना बियाणांचे वाटप करण्यात येत होते. सर्वाधिक हरभरा पिकाचा पेरा तालुक्यात असल्यामुळे व रब्बी हंगामातील हरभरा पिकासाठी जमीन व वातावरण पोषक असल्यामुळे शेतकऱ्यांचा कल हरभरा पेरणीकडे असतो. त्यातच विजय, ज्याकी ९२१८, द्गिविजय यासह विविध जातीचे बियाणे शेतकरी पेरत असतो. दरवर्षी कृषी विभागाकडून मुबलक प्रमाणात बियाणे वाटप केले जाते, परंतु सध्या पाण्याची कमतरता पाहता सोडत पद्धतीने शेतकऱ्यांना बियाणे मिळणार आहे.

त्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्पभूधारक अत्यल्प, भूधारक शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. तालुक्‍यातील शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाकडे ७८८ क्विंटल बियाणाची मागणी करण्यात आली असून २८० क्विंटल सदा विजय या जातीचे बियाणे प्राप्त झाले आहे. तालुक्‍यातील शेतकऱ्यांसाठी बियाण्याचे वाटप करणे महत्‍त्वाचे आपण सवलतीच्या दरात बियाणे मिळणार असल्यामुळे गावातील शेतकऱ्यांच्या याद्या कृषी सहायकाकडून मागवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांची सोडत तालुका कृषी कार्यालयात काढण्यात येणार आहे. तरीही शेतकऱ्यांना प्राप्त झालेल्या बिर्याणी कमी पडणार असून कृषी विभागात आणखी मोठ्या प्रमाणात बियाणे मागवावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

मास्क न वापरल्याबद्दल मोजले ३५ लाख, औरंगाबादेत साडेपाच महिन्यांत सात हजार जणांकडून दंड वसूल

अतिवृष्टीमुळे तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी आर्थिक अडचणीत आहे बाजारातील बियाणे शेतकऱ्यांना परवडणारे नाही. त्यामुळे तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांना अधिक सरसकट बियाणांचे वाटप करावे, अशी मागणी करण्यात येत आहे. रब्बीची पेरणी करण्यासाठी शेतकरी सक्षम नाही. शिवाय प्राप्त झालेले बियाणे ही तुटपुंजे असल्यामुळे या बियाण्याची कमतरता भासणार आहे. त्यामुळे अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना शासनाने विशेष पॅकेज म्हणून बियाणे खतांची मदत करावी अशी मागणी करण्यात येत आहे. दरवर्षी हरभरा बियाणे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शेतकऱ्यांना सवलतीच्या दरामध्ये बियाणे दिले जाते. परंतू उपलब्धता कमी असल्यामुळे सोडत पद्धतीने तालुक्‍यातील शेतकऱ्यांना हरभरा बियाणे मिळणार आहे. त्यामुळे कोणत्या शेतकऱ्याची लॉटरी लागणार त्यांनाच हरभरा बियाणे प्राप्त होणार आहे.

 

संपादन - गणेश पिटेकर
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers Will Get Gram Seeds Through Lottery System Latur News