mantha
manthasakal Media

जन्मदात्याने चिमुकलीस जमिनीवर आपटले

शेजारच्यावर खुनाचा आळ येण्यासाठी भयंकर कृत्य
Published on

मंठा : घराशेजारील महिलेसोबत वाद झाल्यानंतर त्यांच्यावर खुनाचा आळ येण्यासाठी केहाळ वडगाव येथील संशयित अविनाश लिंबा चव्हाण याने आपल्या तीन महिन्यांच्या मुलीला जमिनीवर आपटून ठार केल्याची घटना गुरुवारी (ता. सात) रात्री घडली.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील केहाळ वडगाव येथील अविनाश चव्हाण याच्या घरासमोरील जागेवर गावातील दोघीजणी प्रातःविधीला बसल्या होता. त्यामुळे अविनाश याने त्यांना, ‘तुम्ही घरासमोर संडासला का बसता, तुमच्यामुळे आम्हाला घाण वास येतो असे सांगितले. त्यामुळे दोघीजणींनी नातेवाइकांना बोलावून घेतले. त्यानंतर या नातेवाइकांनी अविनाश यांना शिवीगाळ केली.'

mantha
"...म्हणून त्यांना सोडलं"; NCBचं नवाब मलिकांच्या आरोपांना उत्तर

त्यामुळे शिवीगाळ करणाऱ्यांवर खुनाचा आळ येण्यासाठी संतापाच्या भरात अविनाश याने गुरुवारी रात्री घरात जाऊन आपली दुसरी मुलगी स्नेहा (वय तीन महिने) हिला दोन्ही हाताने धरून जमिनीवर जोरात आपटले. त्यामुळे स्नेहा हिच्या डोक्याला गंभीर मार लागला. ही बाब लक्षात येताच शेजारील ग्रामस्थ तसेच तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष गणेश दवणे यांनी स्नेहा हिला सरकारी दवाखान्यात दाखल केले, तेथे डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले.

mantha
Samantha |"ते म्हणतात माझं अफेअर होतं, मी गर्भपात केला"

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस उपविभागीय अधिकारी राजू मोरे व पोलिस निरीक्षक संजय देशमुख यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. संशयित अविनाश याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी रमेश लिंबा चव्हाण यांच्या फिर्यादीवरून मंठा पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता.आठ) गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास बलभीम राऊत करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com