
बीडमध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी आहे. अशातच आता बीडमधील गेवराईमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. जनावरांच्या गोठ्यात बांधलेल्या गतिमंद मुलीची सुटका करण्यात आली आहे. शेजारील महिलेच्या जागरुकतेमुळे या मुलीची सुटका झाली असल्याचे समोर आले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.