मुख्याध्यापक पित्याने केला तीन मुलींवर अत्याचार, नात्याला काळिमा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 2 April 2020


बाप-लेकीच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या घटनेने बीड जिल्हा हादरला 

केज (जि. बीड) - तालुक्यातील एका खासगी शिक्षण संस्थेत मुख्याध्यापक पदावर कार्यरत असलेल्या पित्यानेच आपल्या स्वत:च्या तीन मुलींवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी मुलीने दिलेल्या तक्रारीवरून पित्यासह, आई, भाऊ, चुलते व चुलत भाऊ यांच्या विरोधात गुरुवारी (ता. २ मार्च) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

तालुक्यात पित्यानेच पोटच्या मुलींशी अशाप्रकारे बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या घटनेने तालुका हादरला आहे. मुख्याध्यापक म्हणून एका खासगी शिक्षण संस्थेत सेवेत असलेल्या पित्यानेच आपल्या पोटच्या दोन मुलीवर अत्याचार तर तिसऱ्या मुलींचही लैंगिक शोषण केले आहे. मंगळवारी (ता. ३१ मार्च) मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास मुली ज्या खोलीत झोपलेल्या खोलीत जावून थोरल्या मुलीला वाईट हेतूने स्पर्श केला.

हा प्रकार तिने आईला सांगितल्यानंतर याची वाच्यता करू नये; म्हणून त्यांना काठीने व लाकडाने बेदम मारहाण करून दोरखंडाने गळा आवळून जिवे मारण्याच्या प्रयत्न केला. त्यानंतर रात्री विष पाजून त्यांना जीवे मारण्याचा कट आखला होता. हा प्रकार तिघींनी मिळून आईला सांगूनही सर्व नातेवाइकांनी तुम्ही गप्प बसा; नाहीतर तुम्हाला मारून टाकू! अशी धमकी देऊन मारहाण केली. हा सर्व प्रकार त्या तिघी बहिणी जीवाच्या भीतीने सहन करीत होत्या.

औरंगाबादच्या बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा
 
मैत्रिणीला सांगितली आपबिती
हा सर्व अन्याय सहन न झाल्याने हा प्रकार एका मुलीने तिच्या मैत्रिणीच्या मावशीला सांगितला. तिच्या मदतीने ही माहिती एका सामाजिक कार्यकर्त्याद्वारे पोलिसांना कळविण्यात आली. त्यानंतर पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांनी त्या पीडित मुलींची भेट घेऊन झालेल्या प्रकाराची त्यांच्याकडून संपूर्ण हकीकत ऐकून घेतली. माहिती मिळताच केज पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करून पित्यास ताब्यात घेऊन घेतले.

या प्रकरणी पित्यासह, आई, भाऊ, चुलते व चुलत भाऊ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब 
सिद्धे हे करीत आहेत. या घटनेची माहिती मिळताच केज पोलीस ठाण्याला प्रभारी पोलीस उपअधिक्षक राहुल धस यांनी भेट दिली. या प्रकरणाचा पुढील तपासकामी संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांना सूचना देऊन मार्गदर्शन केले.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Father Rape On Three girls At Kej dist Beed