FDA Crime : छत्रपती संभाजीनगरात एफडीएचा धडाका! बगारिया ऑइलचे परवाने निलंबित; २ कोटी ९३ लाख ३५ हजार ६०३ रुपयांचे १ लाख ९० हजार ६५५ किलो खाद्यतेल जप्त..

अत्यंत अस्वच्छ स्थितीत खाद्यतेलाचे रिपॅकिंग; नागरिकांच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ उघड.
FDA Crime

FDA Crime

sakal

Updated on

- रविंद्र गायकवाड

बिडकीन - नागरिकांच्या ताटात पोहोचणाऱ्या खाद्यतेलाच्या गुणवत्तेशी आणि आरोग्याशी थेट खेळ करणाऱ्या उद्योगांवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मोठा घाव घातला आहे. शहरातील लक्ष्मण चावडी (अभिनय थिएटरमागे) आणि पैठण रोडवरील गेवराई तांडा परिसरातील बगारिया ऑइलच्या दोन युनिटवर टाकलेल्या धडक छाप्यात तब्बल २ कोटी ९३ लाख ३५ हजार ६०३ रुपये किमतीचे १ लाख ९० हजार ६५५ किलो खाद्यतेल जप्त करण्यात आले. या गंभीर अनियमिततेमुळे दोन्ही कंपन्यांचे अन्न व्यवसाय परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले असून, या कारवाईमुळे खाद्यतेल उद्योगात एकच खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com