कोरोना’ची भीती ः नांदेडच्या पालकमंत्र्यांचा आदर्श ई-लोकदरबार 

e lokdarbar
e lokdarbar

नांदेड ः कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी जगभरात विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. भारतात आणि महाराष्ट्रातही कोरोना पसरु नये, याची काळजी घेण्यात येत आहे. नांदेडला देखील कोरोनाला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे सर्व ती खबरदारी घेण्यात येत आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण कोरोनाच्या अनुषंगाने मुंबईहून नांदेडला गुरुवारी आले असून त्यांनी देखील आढावा घेतला आहे.  

नांदेड जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांच्यासह इतर अधिकारी आणि कर्मचारी सर्वतोपरी काळजी घेत आहेत. टप्याटप्याने उपाययोजना करण्यासोबतच जनजागृती तसेच गर्दी टाळण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. 

पालकमंत्र्यांनी केले आवाहन
कोरोनाला रोखण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेडला जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी नागरिकांनी काळजी घ्यावी आणि सुरक्षित रहावे, असे सांगून करुन ई - लोकदरबारच्या माध्यमातून संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

नांदेड - इ - लोकदरबार
कोरोनाला रोखण्यासाठी प्रवास व गर्दी टाळण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्यामुळे नांदेड जिल्‍ह्यातील नागरिकांना निवेदन देण्यासाठी प्रवास करुन माझ्या कार्यालयात येण्याची आवश्‍यकता भासू नये, यासाठी कोरोनाचे संकट टळेपर्यंत मी नांदेड - इ - लोकदरबार सुरु करत आहे. या द्वारे तातडीचे काम असल्यास आपण मोबाईल किंवा कॉम्प्युटरवर bit.iy/Nanded-E-Lokdarbar ही लिंक ओपन करुन घरबसल्या मला निवेदन पाठवू शकता. 

सोशल मीडियाचा घेतला आधा
पालकमंत्री चव्हाण यांनी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी श्री गुरुगोविंदसिंघजी स्मारक शासकीय रुग्णालयात जाऊन ‘कोरोना’ या आजाराच्या संशयीत रुग्णांसाठी तयार करण्यात आलेल्या विलगीकरण (आयसोलेशन) कक्षाची पाहणी केली. यावेळी त्यांनी जिल्हाशल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. सुरेशसिंघ बिसेन, जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. बी. एम. शिंदे यांना योग्य त्या सूचना देऊन खबरदारी घेण्याचा सल्ला दिला. वेळी त्यांनी नांदेड - इ - दरबार सुरु करत असल्याचे सांगितले. तसेच या संदर्भातील लिंकही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली असल्याचे सांगितले आहे. तसेच कोरोनाबाबत काळजी घ्या, सुरक्षित रहा!, असे आवाहन केले आहे. 

सर्वांनी योग्य ती खबरदारी घ्यावी 
कोरोना आजाराबद्दल सामान्य जनतेच्या मनात भीती आणि गैरसमज आहेत. परंतू, या आजाराबद्दल भिती बाळगण्याचे कारण नसले तरी, सर्वांनी योग्य ती खबरदारी घ्यावी लागणार आहे. महाराष्ट्र सध्या दुसऱ्या फेज मधून जात असून, कोरोनासारख्या जीवघेण्या आजाराला परतवून लावण्यासाठी सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. शासनाकडून करण्यात येत असलेल्या सर्व सुचनांचे योग्य ते पालन व्हावे. द्वेश भावनेतून कुणीही अफवा पसरवू नयेत. सोशल मीडियातून कुणीही अफवा पसरवु नयेत. जर कोणी अफवा पसरवत असेल तर संबंधीता विरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. 
- अशोक चव्हाण, पालकमंत्री, नांदेड. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com