esakal | मुलीच्या आजाराच्या धास्तीने विष प्राशन केल्याने आईचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

women died

- माजलगाव येथे पोटच्या अडीच वर्षाच्या मुलीच्या हृदयाला दोन छिद्र असल्याचे निदान झाल्यानंतर आता ईलाज कसा करायचा.

- याची धास्ती घेतलेल्या आईने शुक्रवारी (ता.२३) विष प्यायले.

- उपचारादरम्यान रविवारी (ता.२५) पहाटे त्यांचा मृत्यू झाला. 

मुलीच्या आजाराच्या धास्तीने विष प्राशन केल्याने आईचा मृत्यू

sakal_logo
By
पांडुरंग उगले

माजलगाव : पोटच्या अडीच वर्षाच्या मुलीच्या हृदयाला दोन छिद्र असल्याचे निदान झाल्यानंतर आता ईलाज कसा करायचा. याची धास्ती घेतलेल्या आईने शुक्रवारी (ता.२३) विष प्यायले. उपचारादरम्यान रविवारी (ता.२५) पहाटे त्यांचा मृत्यू झाला. सोनाली वैभव मंगरूळकर (वय,२६, रा. शिवाजी नगर, माजलगाव जि. बीड) असे मृत्यू झालेल्या आईचे नाव आहे. 

सोनाली मंगरूळकर यांच्या अडीच वर्षाची मुलगी सतत आजारी पडत होती. तिचे संपूर्ण चेकअप केल्यानंतर मुलीच्या हृदयाला दोन छिद्र असल्याचे निदान झाले. हे कळताच आता आपल्या मुलीचे कसे होणार, परिस्थिती बिकट असल्याने मुलीच्या आजारावर ईलाज कसा करायचा, याची धास्ती घेतलेल्या सोनाली यांनी शुक्रवारी फिनेल नावाचे विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

शहरातील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान रविवारी (ता.२५) पहाटे उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने शहरात हळहळ व्यक्त केली जात असून सोनाली यांचे वैभव मंगळूरकर यांच्या माहितीवरून शहर पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूचा गुन्हा दाखल झाला आहे.

loading image
go to top