साक्षगंध सोहळ्यात तृतीयपंथीयांचा सत्कार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जून 2019

औरंगाबाद : रूढी-परंपरांना बगल देत नंदनवन कॉलनी येथील प्रधान-खैरे कुटुंबीयांनी मंगळवारी (ता. 18) मुलांच्या साक्षगंध सोहळ्यात तृतीयपंथीयांचा संविधानाची प्रत देऊन सत्कार केला व सामाजिक समतेचा संदेश दिला. 

माजी नगरसेवक बंडू प्रधान व उषा प्रधान यांची मुलगी सांची व डॉ. भास्कर खैरे व डॉ. प्रभा खैरे यांचा मुलगा डॉ. सम्यक यांचा साक्षगंध समारंभ बौद्ध पद्धतीने मंगळवारी झाला. यावेळी तृतीयपंथीयांना निमंत्रित करून सन्मानित करण्यात आले. हा सत्कार आमच्यासाठी विलक्षण अनुभव असून, चांगला संदेश या माध्यमातून समाजासमोर दिला गेला, असे उद्‌गार शमिबा यांनी यावेळी काढले.

पिंकी गुरू (श्रीरामपूर), सीमा गुरू (गंगापूर), शिल्पा गुरू (औरंगाबाद), धनश्री, हीना, आँचल, पूनम आणि शमिबा, समन्वयक रोहिणी या तृतीयपंथीयांना संविधानाची प्रत देऊन यावेळी सन्मानित केले. घरातील विधवा स्त्रियांना मान देत त्यांच्या हस्ते सम्यक-सांचीला शुभेच्छा देण्यात आल्या. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: felicitation of transgender in engagement at Aurangabad