प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बंद गेटबाहेरच महिलेची प्रसूती

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 एप्रिल 2018

विहामांडवा - विहामांडवा (ता. पैठण) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला वेळेत दाखल करून न घेतल्याने आरोग्य केंद्राच्या गेटसमोरच महिलेची प्रसूती झाली. ही घटना शनिवारी (ता. १४) सकाळी साडेसातच्या सुमारास घडली. येथील रामदास माणिक शेजूळ हे आपल्या नातेवाईक मुलीला प्रसूतीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन आले. उपस्थित डॉक्‍टरांना खोलीवर जाऊन त्याची माहिती दिली. त्यांनी परिचारिकेस बोलाविण्यास सांगितले; मात्र परिचारिकेस येण्यास तब्बल वीस मिनिटे वेळ लागला. तोपर्यंत गर्भवती महिला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बंद गेटबाहेरच प्रसूत झाली.

 आरोग्य विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या जननी सुरक्षा योजना, १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका हे केवळ नावालाच उरले आहेत. प्रत्यक्षात या योजनेचा बट्ट्याबोळ झालेला अनुभवायला येत आहे. संबंधित परिचारिकेस उशिरा येण्याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले, की माहिती मिळताच मी आले; परंतु तोपर्यंत त्या प्रसूत झाल्या होत्या. माझी दुसऱ्या ठिकाणी ड्यूटी आहे; पण येथे राहते म्हणून आले. 

या आरोग्य केंद्रात कर्मचारी कमी आहेत. आम्ही दर महिन्याच्या बैठकीत वरिष्ठांकडे कर्मचाऱ्यांची मागणी करतो. ज्या परिचारिका आहेत त्या या प्राथमिक केंद्राअंतर्गत येणाऱ्या उपकेंद्रावर कार्यरत आहेत. 
- वाय. एस. सोनकांबळे,  वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, विहामांडवा.

Web Title: Female delivery of woman outside the closed gate of hospital