खताची टंचाई भासणार?

hingoli photo
hingoli photo

कळमनुरी (जि. हिंगोली): खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना लागणाऱ्या खताची आवश्यकता पाहता कृषी विभागाकडून १७ हजार ८४० मॅट्रिक टन खताच्या मागणीनंतर आतापर्यंत केवळ ११ हजार ७०० मेट्रिक टन खत उपलब्ध झाले आहे. यामध्ये डीएपी खताच्या मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाल्यामुळे खताची टंचाई भासणार की काय ? अशी भीती शेतकऱ्यांतून व्यक्त केली जात आहे.

या वर्षी हवामान खात्याकडून मान्सून वेळेवर येण्याचे सांगितले जात असल्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी सुरू केली आहे. बी- बियाणे व खत खरेदीसाठी शेतकऱ्यांनी कृषी केंद्रांवरून लगबग चालविली आहे.

बाजारपेठेत डीएपी खताची कमतरता

 यात सोयाबीन, तूर, उडीद, मूग, ज्वारी बियाणाची खरेदी सुरू केली आहे. १०. २६. २६, २०. २०. ०. १३, १२. ३२. १६, २४. २४. ०, युरिया, १५. १५. १५, डीएपी, सिंगल सुपर फास्फेट, एमओपी या खताची मागणी केली जाते. त्यातही एकाच कंपनीच्या डीएपी खताला शेतकऱ्यांची वाढती मागणी पाहता मागणीच्या तुलनेत डीएपी खताची बाजारपेठेत कमतरता जाणवत आहे.

एकाच कंपनीचा आग्रह धरू नये

त्यामुळे शेतकऱ्यांनी डीएपी खत खरेदी करताना एकाच कंपनीचा आग्रह धरू नये, ज्या कंपनीचे डीएपी खत मिळेल ते खरेदी करावे, असे कृषी विभाग व विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. खरीप हंगामाकरिता कृषी विभागाने शेतकऱ्यांना लागणाऱ्या खत साठ्याच्या तुलनेत मागणी नोंदवली आहे. 

१७ हजार ८४० मेट्रिक टन खताची मागणी

त्यामध्ये तीन हजार ४८५ मेट्रिक टन युरिया, एक हजार ८९२ मेट्रिक टन डीएपी, एक हजार ४७४ मेट्रिक टन एमओपी, पाच हजार ३२१ मेट्रिक टन एसएसपी खतसाठा उपलब्ध झाला आहे. कृषी विभागाकडून १७ हजार ८४० मेट्रिक टन खताची मागणी नोंदविण्यात आली आहे. 

आतापर्यंत चार रॅक लागल्या

यामध्ये तीन हजार ७६० मेट्रिक टन डीएपी खताची मागणी असताना आतापर्यंत केवळ एक हजार ८९२ मेट्रिक टन डीएपी उपलब्ध झाले आहे. हिंगोली येथे आरसीएफ मुंबई, कोरोमंडल कंपन्यांच्या आतापर्यंत चार रॅक लागल्या आहेत. उर्वरित खत कंपन्यांच्या रॅक नांदेड, आकोला व परभणी येथे लागतात. 

लॉकडाउनचा खत कंपन्यांना फटका

तेथून जिल्ह्याला खताचा पुरवठा करण्यात येतो. कोरोनामुळे दोन महिन्यांपासून बंद असलेल्या कामकाजाचा फटका खत कंपन्यांनाही बसला असून कामगार व इतर तांत्रिक अडचणींमुळे वेळेशीर खताचा पुरवठा करणे शक्य होत नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात खत उपलब्ध करून देण्याचे आव्हान कृषी विभागासमोर उभे टाकले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com