झेंडा काढल्याचा कारणावरून दोन गटात हाणामारी 

वैजीनाथ जाधव
शनिवार, 7 जुलै 2018

गेवराई (बीड) : चौकाचे विनापरवाना नामकरण करून लावलेला झेंडा काढल्याच्या कारणावरून दोन गटात जबर हाणामारी आणि दगडफेकीची घटना शनिवारी (ता. 7) तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २२२ वरील मारफळा फाटा येथे घडली. यामध्ये दहा जण जखमी झाले. 

गेवराई (बीड) : चौकाचे विनापरवाना नामकरण करून लावलेला झेंडा काढल्याच्या कारणावरून दोन गटात जबर हाणामारी आणि दगडफेकीची घटना शनिवारी (ता. 7) तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २२२ वरील मारफळा फाटा येथे घडली. यामध्ये दहा जण जखमी झाले. 

गोरसेनेच्या कार्यकर्त्यांनी तालुक्यातील मारफाळा फाटा येथे मारफळा गावात जाणाऱ्या रस्त्यावर शुक्रवारी (ता. सहा) गोरसेनेचा झेंडा लावून चौकाची स्थापना केली. झेंडा मध्यभागी न लावता एका एका बाजूला लावण्याची ग्रामस्थांची विनंतीही या कार्यकर्त्यांनी ऐकली नाही. तसेच चौकाचे जयसेवालाल असे नामकरण केले. यामुळे मारफळा ग्रामस्थांनी तलवाडा पोलीस ठाण्याला तक्रार दिली व पोलिसांच्या मदतीने झेंडा त्याठिकाणाहून काढून नेला.

झेंडा कोणी काढून नेला हे गोरसेनेच्या कार्यकर्त्यांना कळले नसल्यामुळे त्यांनी शनिवार  मारफळा गावातुन फाट्याकडे येणाऱ्या ग्रामस्थांना मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाणी नंतर दगडफेक सुरू झाली. या मारहाणीमध्ये मारफळा गावातील जलींदर धोंडीराम कादे, बळीराम लक्ष्मण गिरी हे गंभीर जखमी झाले असून त्यांना बीड येथे रुग्णालयात दाखल केले आहे. तर नारायण ब्रम्हनाथ डरफे, योगेश विठ्ठल गिरी, राधाकिसन बारीक भिसे, सचिन दास भिसे, अगद कुटे, जयराम गिरी, गोवर्धन घाडगे, अमोल कादे, दीपक कांबळे, अनावर बेग आदी जखमी झाले असून त्यांना जातेगाव, गेवराई, व तालखेड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच तलवाडा पोलिस घटनास्थळी पोचले. परिस्थिती नियंत्रणाखाली नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी बीड येथून दंगल नियंत्रण पथकाला पाचारण केले. पोलीस व ओअथकाने ओरियातहीती नियंत्रणात आणली.

Web Title: fight between 2 groups for flag in gewrai beed district