Video : ‘कोरोना’शी लढा : नांदेडच्या आदित्यची ‘फेस शिल्ड’ किट ठरतेय वरदान

शिवचरण वावळे
सोमवार, 6 एप्रिल 2020

दिवसेंदिवस ‘कोरोना’चा धोका वाढतच चालला आहे. त्यामुळे रात्रंदिवस नागरिकांच्या आरोग्यासाठी झटणारे डॉक्टर, आरोग्य व पोलीस कर्मचारी यांचा जवळुन संपर्का येत आहे. त्यांच्याही आरोग्याची काळजी आपण का घेऊ नये? या उदात्त हेतुने नांदेडच्या अदित्य काबरा व त्यांच्या व्हेंटर सेंटर स्टार्टअप टिमच्या मदतीने ‘एम -१९ फेस शिल्ड’ किट तयार केली आहे.

नांदेड : अदित्य काबरा व त्याच्या टिमने तयार केलेली ‘एम -१९ फेश शिल्ड’ किट पोलीस प्रशासन, आरोग्य विभागातील डॉक्टर्स, कर्मचारी यांच्यासाठी मोठे वरदान ठरत आहे. अतिशय कमी वजनाची असल्याने वापरण्यासाठी अतिशय उत्तम व सोयीची मानली जात आहे.

अदित्यने आत्तापर्यंत पुण्यात सहा हजार किट तयार करुन पोलीस व आरोग्य कर्मचारी यांना मोफत वाटप देखील केल्या आहेत. मुलाकडुन प्रेरणा घेत अदित्यची आई चंदा काबरा यांनी लॉकडाऊनचा सद्पयोग करत घरात राहुन प्लायउडची सिट, इलेस्टीक व प्लास्टीकच्या रिसायकल पन्नीपासून ‘एम -१९ फेश शिल्ड’ तयार करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी त्यांनी नांदेडमध्ये ‘टिम साहाय्य’ असा ग्रुप तयार केला आहे. 

हेही वाचाच - गरजूंच्या मदतीला धावले उद्योजक

या टिममध्ये चंदा काबरा, सत्संग परिवाराचे नारायण रेकी, सिद्धान्त धबाले, मानसी काबरा, डॉ. समीर देशमुख, सिद्धी कासलीवाल, तेजिंदरसिंघ संधु, अमेय वायकर, आकाश रोडा, सौरभ शिरफुले, ब्रिजेश किशोर जाजू यांचा समावेश आहे. आत्तापर्यंत या ग्रुपने सहाशे ‘फेश शिल्ड’ किट तयार पोलीस विभागाला दिलेल्या आहेत. तसेच सोमवारी (ता.सहा एप्रिल २०२०) पर्यंत ते साडेसातशे किट्स पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर यांच्याकडे सुपूर्द करणार असल्याची माहिती सरिता काबरा यांनी दिली.    

‘फेश शिल्ड’च्या कामास गती आली
अदित्यच्या आईची ही कल्पना बघुन हरिश लालवाणी यांनी लेझर सिट मोफत उपलब्ध करुन दिले आहे. यासाठी महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश सिंह बिसेन यांच्या मदतीने लॉकडाऊनच्या काळातही त्यांनी पोलीस अधिक्षक विजय कुमार मगर यांच्याकडून साहित्य उपलब्धीसाठी परवानगी घेत दुकानातुन लागणारे साहित्य विकत घेतले. आणि पोलीस कर्मचारी व आरोग्य कर्मचारी यांच्या आरोग्याच्या दृष्टिने सुरक्षित असलेली ‘फेश शिल्ड’ किटच्या कामास गती आली.

येथे क्लिक करा वृत्तपत्रांवरील लोकविश्‍वास, कसा? तो वाचलाच पाहिजे

सुरक्षा किट उपक्रमाची इतर शहरात सुरुवात
आम्ही सुरु केलेला हा उपक्रम बघून हैदराबाद, जळगाव आणि दिल्ली येथील अदित्यच्या मित्रांनीही ‘फेश शिल्ड’`किट तयार करण्याचे काम सुरु केले आहे. या किटपासून संरक्षण म्हणजे, समोरची व्यक्ती शिंकली तरी, त्यांच्यापासून सुरक्षितता पाळता येते. 
- चंदा काबरा (नांदेड)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fighting Corona: Nanded's Aditya's Face Shield Kit is a boon