पोलिस कुटुंबीयांत ‘फ्रीस्टाईल’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 फेब्रुवारी 2019

औरंगाबाद - शिवाजीनगर येथील एका रुग्णालयासमोर दोन पोलिस कुटुंबीयांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यात दोन्हीकडील काहीजण जखमी झाले असून, ही घटना मंगळवारी (ता. पाच) सकाळी अकराच्या सुमारास घडली. पोलिस कुटुंबीयांतच मारहाणीचा प्रकार घडल्याने काहीवेळ रुग्णालय व परिसरातील वातावरण तणावाचे होते.

औरंगाबाद - शिवाजीनगर येथील एका रुग्णालयासमोर दोन पोलिस कुटुंबीयांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यात दोन्हीकडील काहीजण जखमी झाले असून, ही घटना मंगळवारी (ता. पाच) सकाळी अकराच्या सुमारास घडली. पोलिस कुटुंबीयांतच मारहाणीचा प्रकार घडल्याने काहीवेळ रुग्णालय व परिसरातील वातावरण तणावाचे होते.

गणेश संपत चव्हाण (रा. बोकूड जळगाव, ता. पैठण) यांनी त्यांची पत्नी सोनल यांना चार फेब्रुवारीला सायंकाळी पाचच्या सुमारास शिवाजीनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्यावेळी रुग्णालयात गणेश यांचे आई, वडील व सासू मुक्कामी होते. रुग्णालयात रात्री अकराच्या सुमारास छाया हिरालाल राठोड, सरला प्रभाकर माने, संदीप हिरालाल राठोड, सचिन राठोड व अन्य एक नातेवाईक रुग्णालयात आले. रवी संपत चव्हाण कुठे आहे याबाबत विचारणा करून त्याला सोडणार नाही, अशी धमकी देत निघून गेले. फिर्यादी गणेश चव्हाण याचा भाऊ रवी संपत चव्हाण पुण्याहून रुग्णालयात पाच फेब्रुवारीला सकाळी आला. गणेश यांच्या पत्नीला सुटी झाल्याने ते सकाळी अकराच्या सुमारास रुग्णालयातून बाहेर जात होते.

त्यावेळी रुग्णालयाच्या गेटवर छाया व सरला आल्या. त्यांनी गणेश यांच्या आईला मारहाण सुरू केली. तेथे हिरालाल राठोड, संदीप राठोड व अन्य एकजण आला. त्यांनी रवी संपत चव्हाण व संपत चव्हाण यांना फायटरने मारहाण सुरू केली. यानंतर गणेश चव्हाण यांच्या गटाकडूनही प्रत्युत्तर देण्यात आले. दरम्यान, सचिन राठोड, सरला राठोड, अनिल चव्हाण, रवी शंकर चव्हाण, रामधन राठोड यांनीही हाणामारीत भाग घेतला. यानंतर वातावरण गंभीर बनल्याने पोलिसांना बोलावण्यात आले. त्यांनी परिस्थिती आटोक्‍यात आणली. या प्रकरणात दोन्ही गटांकडून परस्पर तक्रारी देण्यात आल्या. त्यानुसार पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली.

सीसीटीव्हीत हाणामारी कैद
फ्री स्टाईल हाणामारी सहभागी पोलिस कुटुंबीय असून, यात एक जण ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालय, अन्य दोन चिकलठाणा पोलिस ठाण्यात, तर उर्वरित संशयितांपैकी काहीजण पोलिस असल्याची माहिती तक्रारीतील माहितीनुसार समोर आली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

Web Title: Fighting in Police Family Crime