मुलीसोबत अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या भोंदूबाबासह दोघांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 जुलै 2018

हिंगोली - एका अल्पवयीन मुलीस बाहेर बाधा झाल्याच्या कारणावरून कळमनुरी येथे आणून तिच्याशी अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या भोंदूबाबा सह दोघांवर कळमनूरी पोलीस ठाण्यात गुरुवारी तारीख 26 रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे

हिंगोली - एका अल्पवयीन मुलीस बाहेर बाधा झाल्याच्या कारणावरून कळमनुरी येथे आणून तिच्याशी अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या भोंदूबाबा सह दोघांवर कळमनूरी पोलीस ठाण्यात गुरुवारी तारीख 26 रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे

अकोला येथील एका अल्पवयीन मुलीच्या अंगावर मागील काही दिवसापासून लाल व काळे चट्टे येऊ लागले होते. त्या मुलीच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात तिची प्रकृती दाखवून औषधोपचारही घेतले. मात्र मुलीची प्रकृती चांगली झालीच नाही. त्यानंतर त्यांची बुलढाणा जिल्ह्यातील सावरखेडा येथील शेख कौसर व चांद ड्रायव्हर यांच्याशी भेट झाली. त्यांनी मुलीस शेख कौसर यास दाखविले. मुलीस बाहेर बाधा झाली आहे तिच्यावर उपचार करावे लागतील असे सांगत मुलीस व तिच्या कुटुंबियास कळमनुरी येथे आणले. त्यानंतर कळमनुरी येथे एके ठिकाणी थांबवून तिच्यावर बाहेर बाधा काढण्याचे प्रयोग सुरू केले. तिच्या कुटुंबीयांना बाजूला थांबवून त्या मुलीस दूर अंतरावर नेऊन तिच्यासोबत शेख कौसर याने अनैसर्गिक कृत्य केले. तर चांद ड्रायव्हर यांनी त्याचे छायाचित्रण केले.

या प्रकारानंतर सर्वजण आपापल्या गावी निघून गेले. काही दिवसानंतर या दोघांनी त्या मुलीच्या कुटुंबीयांना छायाचित्रीकरण दाखवून पैशाची मागणी केली. एकवेळ सहा हजार रुपये देखील त्यांच्याकडून घेतले. त्यानंतर सतत पैशाची मागणी होत असल्यामुळे त्या मुलीच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कळमनुरी येथे गुरुवारी तारीख 25 सायंकाळी उशिरा तक्रार दिली. यावरून पोलिसांनी वरील दोघांवर बाल लैंगिक अत्याचार  कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक सुधाकर आडे यांचे पथक आरोपीच्या शोधासाठी रवाना करण्यात आले आहे.

Web Title: file crime against 2 for assault a girl