esakal | महाविद्यालयाच्या जमीन हस्तांतरणाची फाईल उद्योगमंत्र्यांकडे अडली
sakal

बोलून बातमी शोधा

faujiya khan

महाविद्यालयाच्या जमीन हस्तांतरणाची फाईल उद्योगमंत्र्यांकडे अडली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

परभणी : परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मंजुरीची प्रक्रिया आता अंतिम टप्पात आली आहे. परंतू जमीन हस्तांतरणाची फाईल उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या स्वाक्षरीमुळे अडकली आहे असा आरोप करीत या स्वाक्षरीसाठी जनआंदोलनाच्या माध्यमातून रेटा लावावा लागणार आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा खासदार फौजिया खान यांनी बुधवारी दिली. (Parbhani News)

परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर व्हावे या संदर्भात राष्ट्रवादी कॉग्रेसच्या खासदार फौजिया खान यांनी बुधवारी एका व्हिडिओच्या माध्यमातून त्यांची प्रतिक्रिया नोंदविली आहे. या प्रतिक्रियेत त्या म्हणतात, परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिळावे यासाठी अनेक वर्षापासून परभणीकर संघर्ष करत आहेत. आतापर्यंत भौतिक सुविधा निर्माण करणे, प्रस्ताव पाठविण्याची कामे करण्यात आली आहेत. तेव्हापासून हे आंदोलन सुरू झाले होते. परंतू आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मंजुरीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. आता शेवटचा रेटा द्यावा लागणार आहे.

हेही वाचा: अन् पुरासोबत शेतकऱ्यांचे स्वप्न वाहून गेले

कॅबिनेटमध्ये सुध्दा फाईल बुक करण्यात आली आहे. ती अर्थ मंत्रालयात गेली आहे. परंतू महाविद्यालयासाठी लागणाऱ्या जमीन हस्तांतरणावर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी अद्यापही स्वाक्षरी केलेली नाही. त्यामुळे ही प्रक्रिया रख़डली आहे. उद्योगमंत्र्यांच्या स्वाक्षरीसाठी आता परभणीतील नेत्यांना लक्ष देऊन ते काम प्राधान्यक्रमाने करावे लागणार आहे असे ही खासदार फौजिया खान म्हणाल्या. आता परभणीकरांचे हे जनआंदोलन झाले आहे. हा लढा शेवटचा म्हणून लढावा लागणार आहे, असेही त्या म्हणाल्या.

loading image
go to top