जिंतूरचे सिंचन विहीरी घोटाळा प्रकरणी सहा अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गुन्हा

राजाभाऊ नगरकर
रविवार, 19 ऑगस्ट 2018

सन २०१३ ते १६ कालावधीत शासकीय निकष धाब्यावर बसवून रोहयोतंर्गत दोन हजार ४४२ सिंचन विहिरी वाटप केल्या होत्या. ही माहिती शेख जाकीर यांनी माहिती अधिकारातून प्राप्त केली होती. त्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संगनमताने पंचाहत्तर लाख रूपयांची शासनाची फसवणूक केल्याचे समोर आले.

जिंतूर - तालुक्यातील सिंचन विहीरींच्या घोटाळ्याप्रकरणी अखेर न्यायालयाच्या आदेशावरून शुक्रवारी (ता. १७) सहा अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. सदर प्रकरणी प्रशासकीय चौकशी होत नसल्याने आरटीआय 
कार्यकर्ता शेख जाकीर शेख सगीर यांनी अॅड. इद्रिस कादरी यांच्यामार्फत न्यायालयात धाव घेतली होती. 

सन २०१३ ते १६ कालावधीत शासकीय निकष धाब्यावर बसवून रोहयोतंर्गत दोन हजार ४४२ सिंचन विहिरी वाटप केल्या होत्या. ही माहिती शेख जाकीर यांनी माहिती अधिकारातून प्राप्त केली होती. त्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संगनमताने पंचाहत्तर लाख रूपयांची शासनाची फसवणूक केल्याचे समोर आले. तरीही प्रशासनाकडून कार्यवाही होत नसल्याने न्यायालयाने आदेश दिले. त्यानुसार जिंतूरचे तत्कालीन बिडीओ एम. पी. कदम, लघु सिंचनचे उपविभागीय अधिकारी एस. जे. थेटे, पं. स. चे सहाय्यक लेखाधिकारी एस.एम. पाटेकर, विस्तार अधिकारी सूर्यवंशी, डी. टी. पोटे, लिपीक बी. ए. वाठोरे यांच्याविरूद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. 

 

Web Title: Filed the complaint against six officers and employees in the Jintoor Irrigation Well scam case