'स्वाभिमानी'च्या मराठवाडा अध्यक्षांसह नऊ जणांवर गुन्हे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 मे 2018

श्री. काळदाते यांच्या खोट्या सह्या, शिक्के, सातबारा, होल्डींग, पीकपेरा तयार करून खरीप हंगाम २०१६ मध्ये पीकविम्याचा लाभ घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

परभणी - स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या  मराठवाडा अध्यक्षांंसह नऊ जणांविरूद्ध परभणीतील नवामोंढा पोलिसांत मंगळवारी (ता. २९) फसवणूक प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले. परभणी तहसिलचे मंडळ अधिकारी शामसुंदर काळदाते यांनी या बाबतची फिर्याद दिली.

श्री. काळदाते यांच्या खोट्या सह्या, शिक्के, सातबारा, होल्डींग, पीकपेरा तयार करून खरीप हंगाम २०१६ मध्ये पीकविम्याचा लाभ घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरून स्वाभिमानीचे मराठवाडा अध्यक्ष माणिक आश्रोबा कदम, मीना माणिक कदम, रेखा वशिष्ट कदम, किरण वशिष्ट कदम, नीता प्रकाश हारकळ, देवराव मुक्तीराम हारकळ, प्रकाश पुरभाजी कदम, डॉ. अनिल केशव कान्हे, सिंधुबाई देवराव हारकळ यांच्याविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Filing complaints against nine people including swabhimani marathwada chief

टॅग्स