परदेशासह देशातुन आलेल्यांनी भरावा ‘हा’ फार्म

कृष्णा जोमेगावकर
Saturday, 28 March 2020

कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना जारी केल्या आहेत. यानुसार मागील काही दिवसांत पुणे, मुंबई, हैदराबाद किंवा इतर महानगरांमधून नांदेडला आलेल्या नागरिकांची तपासणी आरोग्य विभागाचे कर्मचारी करत आहेत.

नांदेड : कोरोना विषाणूचा प्रभावी मुकाबला करण्यासाठी ता. एक मार्चनंतर भारतात आलेल्या किंवा ता. १४ मार्चनंतर नांदेड जिल्ह्यात आलेल्या नागरिकांनी ऑलाइन माहिती भरण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. मोबाइलवर संकेतस्थळाला भेट देऊन ही माहिती भरू शकता येइल. ज्यांना लागू आहे त्यांनीच ही माहिती भरावी. तसेच आपल्या घरी येणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यास माहिती देऊन प्रशासनास सहकार्य करावे, असेही आवाहन प्रशासनाने केले आहे.

प्रतिबंधात्मक उपाय योजना लागू
कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना जारी केल्या आहेत. यानुसार मागील काही दिवसांत पुणे, मुंबई, हैदराबाद किंवा इतर महानगरांमधून नांदेडला आलेल्या नागरिकांची तपासणी आरोग्य विभागाचे कर्मचारी करत आहेत. ग्रामीण भागातही आलेल्या नागरिकांची तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी करत आहेत, अशा नागरिकांची नोंदही घेतली जात आहे.

हेही वाचा.... कोरोना : नांदेड कारागृहातील पंधरा कैद्यांना जामिन

उपाययोजनेसाठी होइल सोयीचे

जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ हा ता. १३ मार्चपासून लागू करून करून खंड दोन, तीन व चारमधील तरतुदीनुसार ता. १४ मार्चपासून अधिसूचना निर्गमित केली आहे. या साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ मधील तरतुदीनुसार जिल्हाधिकाऱ्यांना शासनाने सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केले आहे. या तरदुतीनुसार जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी नांदेड शहरात बाहेर देशातुन तसेच देशाच्या इतर भागातून आलेल्या नागरिकांना माहिती भरण्याचे आवाहन केले आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाला उपाययोजना करण्यासाठी सोयीचे जाइल. यासाठी नागरिकांनी निर्भय पद्धतीने अर्ज भरावा असे आवाहन केले आहे. 

हेही वाचलेच पाहिजे.... या शहरात घाणीचे साम्राज्य, संसर्गजन्य रोगांची

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातुन अंमलबजावणी 
या अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. सुरेशसिंह बिसेन यांच्यासह इतर विभागप्रमुखांच्या माध्यमातून जिल्ह्यात उपाययोजना राबविण्यात येत आहेत. आजपर्यंत वेगवेगळे आदेश काढून उपाययोजना सुचविल्या आहेत.
 
निर्भय होवून भरा माहिती
माहिती भरताना घाबरून जाऊ नका. अर्जातील माहिती केवळ शासकीय उपयोगासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत आपल्याशी संपर्क करण्यासाठी जतन केली जाणार असून ही माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी सांगीतले आहे. ही माहिती भरण्यासाठी https://docs.google.com/form /d/e/1FAIpQLScBdV24qxpoRM7OzZoY4V_YepjBdyLE8MUkzeAtlfQBtbhZGw/viewform?usp=sf_link या लिंकचा वापर करावा, असे डॉ. विपीन यांनी सांगीतले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fill in the form 'Ha' form with those from the country including the region