महिनाभर पुरेल एवढाच चारा शिल्लक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 ऑक्टोबर 2018

‘औंदा सरासरीच्या निम्माच पाऊस झाला. त्यातबी पावसानं लई दिस इश्रांती घेतल्यानं इहिरीतल्या पाण्यावरच मका, सोयाबीन काढावं लागली. आता रब्बीचा पेरा होणारच न्हाई. इहिरीतल्या पाण्यात कापसाची एखादी भरणी करून, उरलेलं पाणी गुरा-ढोरायला पिण्यासाठी राखून ठेवावं लागंल. शेतीतून काहीतरी हाती येईल या आशेवर काम सुरू हाई,’’ सालूखेडा (ता. खुलताबाद) येथील शेकू वाघ यांनी शेतीत सध्या काय चालू आहे, याचे वास्तव चित्र उभे केले.

शासनाने चारा छावण्या सुरू करण्याची मागणी करून सराई येथील काकासाहेब नागे म्हणाले, ‘‘ तालुक्‍यात नेमकं किती पशुधन हाय, याची आकडेवारी स्पष्ट न्हाई. वैरण म्हणून मक्‍याचा चारा उपलब्ध हाय, पर त्यो जादा तं जादा एखादा महिना पुरंल. खरी चिंता हाई ती पशुधन सांभाळण्याची. त्यामुळं दिवाळीपूर्वीच पशुधन विक्रीकडे शेतकरी वळला असल्याचे चित्र हाय. वैरणीसोबतच पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न लई कठीण बनलाय.’’

कापूस वेचणीला आलेले मजूर आल्या पावली परत
तालुक्‍यात सरासरी गाठणारा पाऊस झाला, तर साधारण खरिपातील मका, मूग, सोयाबीन ही पिके दसऱ्यापर्यंत हाती येतात अन्‌ त्यावेळी सुरू होते ती कापसाची वेचणी. यंदा विदारक चित्र आहे. रब्बीची पेरणी होणार नसल्याने शेत शिवार मोकळे आहे. जनावरांची वैरण जेमतेम महिनाभर पुरेल एवढीच आहे. कापूस वेचणीतून दरवर्षी पैसा कमावणाऱ्या परप्रांतीय मजुरांना कामच नसल्याने हताशपणे परतावे लागत आहे. तालुक्‍यातील खिर्डी, सराई, सालूखेडासह असंख्य गावांमध्ये मध्य प्रदेशातील मजूर मोठ्या प्रमाणात कापूस वेचणीस येतात. यंदा कापसाची स्थिती बिकट असल्याने या मजुरांना आल्या पावली परतावे लागले.

Web Title: Filled with enough fodder for a month