फिल्मीस्टाईल अधिकाऱ्यांमध्ये ‘येथे’झाली हाणामारी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 डिसेंबर 2019

येथील वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता सुमित पांडे व सहाय्यक अभियंता अक्षय वरटवार यांनी विद्युत डिपी बसविण्याच्या कारणावरून कार्यालयात फिल्मीस्टाईल हाणामारी केल्यामुळे वितरण कंपनीचे कर्मचारी व नागरिक हैराण झाले आहेत.

धर्माबाद  ( जिल्हा नांदेड): सध्या निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. यातच दररोजचे जीवन जगताना सामान्य प्रश्‍न कसे सुटतील याची चिंता अनेकांना लागली आहे. याकरिता शेतकऱ्यांसाठी सर्व विभाग सज्ज असताना एका गावात विद्यूत रोहीत्र बसविण्याच्या कारणावरून शेतकऱ्यांच्या मागणीला न्याय देण्यासाठी चक्क दोन अधिकाऱ्यांमध्येच फिल्मीस्टाईल हाणामारी झाल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकाराची सर्वत्र चर्चा होत आहे.  

येथील वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता सुमित पांडे व सहाय्यक अभियंता अक्षय वरटवार यांनी विद्युत डिपी बसविण्याच्या कारणावरून कार्यालयात फिल्मीस्टाईल हाणामारी केल्यामुळे वितरण कंपनीचे कर्मचारी व नागरिक हैराण झाले आहेत. हा प्रकार शनिवारी (ता.सात) सकाळी घडला. शनिवारी सकाळी सहाय्यक अभियंता अक्षय वरटवार यांनी काही गावात डिपी बसविणे गरजेचे असल्याचे उपकार्यकारी अभियंता सुमित पांडे यांना सांगितले. यावरूनच पांडे व वरटवार यांच्यात शाब्दिक चकमक झाली. त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. सदरील हाणामारी कार्यालयातच झाल्यामुळे शेतकरी व कर्मचारी हैराण झाले.

नवलच की हो--‘या’ शहरात वाढले अनधिकृत बांधकाम

हवालदिल शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष

परतीच्या पावसाने झालेल्या अतिवृष्टीमुळे धर्माबाद तालुक्यातील सोयाबीन, कापूस, ज्वारी व इतर पिकांचे आतोनात नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. परंतु, तालुक्यातील अनेक विद्युत डिपीत बिघाड व जळाल्यामुळे शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा होत नाही.

पोलिस स्टेशनला तक्रारीसाठी दोघेही दाखल

हाणामारी करून पांडे पोलिस स्टेशनमध्ये आले. त्यांचा जवाब घेऊन पोलिसांनी त्यांना तपासणीसाठी रूग्णालयात पाठविले. मग अक्षय वरटवार पोलिस स्टेशन मध्ये येऊन तक्रार देण्याच्या मनस्थितीत असताना, वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता चटलावार यांचा फोन आला व लगेच दोघांनाही कार्यालयात बोलावून कार्यकारी अभियंता चटलावार यांनी दोघांची कान उघडणी केली असल्याचे बोलल्या जात आहे. परंतु, बंद रूममध्ये दुसऱ्या अभियंता व कर्मचाऱ्यास येण्यासाठी पायबंद करण्यात आले होते.

असे प्रकार झाले नित्याचेच

जिल्ह्यात किरकोळ कारणावरून हाणामारी होण्याचे प्रमाण वाढले आहे. एरव्ही शेतकरी त्यांच्या समस्यांसाठी एखाद्या कार्यालयात जाऊन भांडतात, आणि आपले प्रश्‍न सोडवून घेतात. मात्र, या वेळी तर अधिकाऱ्यांनी त्यांच्या किरकोळ कारणावरून भांडण केल्याने ह्याची सर्वत्र चर्चा होत आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In the filmstyle executives 'here'