अंतिम यादी तयार; पण बंडखोरीची भीती 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017

औरंगाबाद - जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत स्वबळाच्या लढाईत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांची यादी तयार आहे. मात्र, बंडखोरी होण्याच्या भीतीमुळे अंतिम यादीला अजून वरून मंजुरी मिळाली नाही असे सांगत दोन्ही पक्षांकडून वेळ मारून बंडखोरी थोपविण्याचे काम केले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यादीतील उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी (ता. एक) घरपोच "बी' फॉर्म देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

औरंगाबाद - जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत स्वबळाच्या लढाईत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांची यादी तयार आहे. मात्र, बंडखोरी होण्याच्या भीतीमुळे अंतिम यादीला अजून वरून मंजुरी मिळाली नाही असे सांगत दोन्ही पक्षांकडून वेळ मारून बंडखोरी थोपविण्याचे काम केले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यादीतील उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी (ता. एक) घरपोच "बी' फॉर्म देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. भाजपतर्फे ज्यांची उमेदवारी नक्‍की झाली आहे त्यांना कानमंत्र दिला असून पक्षाच्या या व्यूहरचनेची माहिती इच्छुकांपर्यंत पोचल्याने त्यांची घालमेल सुरू असून काही जणांनी अपक्ष उमेदवारी भरण्याची तयारी केली आहे. 

बुधवारी (ता. एक) उमेदवारी दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. उमेदवारांची यादी जाहीर केली तर बंडखोरीचा सामना करावा लागेल या भीतीने दोन्ही पक्षांकडून शेवटपर्यंत उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली नाही. अंतिम यादी अद्याप पूर्ण झाली नाही, वरिष्ठ नेत्यांनी अजून यादीवर शिक्‍कामोर्तब केले नाही अशी एक ना अनेक कारणे सांगत स्थानिक पदाधिकाऱ्यांनी शेवटच्या दिवसापर्यंत इच्छुकांच्या कोपराला गुळ लावून ठेवले आहे. बुधवारी (ता. एक) उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. ज्यांना उमेदवारी द्यावयाची आहे त्यांना आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनाच पक्षाकडून उमेदवारी दिल्याचे जवळपास माहिती झाले आहे. ज्यांना उमेदवारी देण्याचे निश्‍चित झाले आहे त्यांना शेवटच्या दिवशी घरपोच "बी' फॉर्म देण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. पक्षाच्या या व्यूहरचेनेमुळे इच्छुकांची घालमेल सुरू झाली आहे. तर अनेकांनी पक्ष नको, अपक्ष बरा अशी भूमिका घेत अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याची तयारीही केली आहे. 

Web Title: final list ready But the fear of rebellion