बीड, अंबाजोगाईला अखेर  अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या नेमणुका 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 2 May 2020

बीडचे अपर जिल्हाधिकारी पद हे फेब्रुवारी-२०१९ पासून रिक्त होते व याचा प्रभार उपजिल्हाधिकारी डॉ. प्रवीण धरमकर यांच्याकडे, तर अंबाजोगाई विभागाचे पद गेल्या काही वर्षांपासून रिक्त होते

बीड - जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या बीड व अंबाजोगाई येथील अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या अखेर नेमणुका करण्यात आल्या. बीड व अंबाजोगाई ही दोन अपर जिल्हाधिकारी पदे गेले अनेक दिवस रिक्त होती. या पदांचा पदभार उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे होता. 

राज्य शासनाने पदोन्नतीवरील पदस्थापना व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांवर येत असलेला अधिकचा भार यावरील उपाययोजनांचा भाग म्हणून पदोन्नती-पदस्थापना यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार बीडसाठी अपर जिल्हाधिकारी म्हणून तुषार ठोंबरे तसेच अंबाजोगाई विभागासाठी मंजूषा मिसकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हेही वाचा - जात, धर्म, पंथ बाजूला ठेवून आधी देशाला वाचवा...बघा कोण म्हणतंय... 

बीडचे अपर जिल्हाधिकारी पद हे फेब्रुवारी-२०१९ पासून रिक्त होते व याचा प्रभार उपजिल्हाधिकारी डॉ. प्रवीण धरमकर यांच्याकडे, तर अंबाजोगाई विभागाचे पद गेल्या काही वर्षांपासून रिक्त होते व तेथे शोभा जाधव यांच्याकडे अतिरिक्त प्रभार देण्यात आलेला होता. राज्य शासनाचे उपसचिव डॉ. माधव वीर यांच्या आदेशान्वये या दोन्ही अपर जिल्हाधिकाऱ्यांना नियुक्त स्थळी तत्काळ रुजू होण्याचे आदेशित करण्यात आले आहे. 

हेही वाचा - देश लॉकडाऊन न करताही कोरोनाशी लढा, वाचा या देशाची कहाणी...

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Finally Appointment of Additional Collector Beed & Ambajogai