esakal | Maharashtra Budget2021 : उस्मानाबादमध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याचा मार्ग सुकर, अर्थमंत्री अजित पवारांची महत्त्वाची घोषणा
sakal

बोलून बातमी शोधा

Osmanabad Medical College News

गेल्या अनेक वर्षांपासून उस्मानाबादमध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुरु करावी अशी मागणी होत होती. त्यास आता मूर्त रुप मिळणार आहे.

Maharashtra Budget2021 : उस्मानाबादमध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याचा मार्ग सुकर, अर्थमंत्री अजित पवारांची महत्त्वाची घोषणा

sakal_logo
By
टीम ई सकाळ

उस्मानाबाद : मराठवाड्यातील उस्मानाबाद येथे वैद्यकीय महाविद्यालय उभारणार असल्याची घोषणा राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषणा केली आहे. यासाठी आरोग्य विभागास यंदा २ हजार ९०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. आज सोमवारी (ता.आठ) राज्याचे २०२१-२२ वर्षासाठी अर्थसंकल्प अर्थमंत्री पवार यांनी विधानसभेत सादर केले. त्यासाठी आरोग्य विभागास यंदा २९०० कोटी रुपयांची मंजूर करण्यात आले आहे.

औरंगाबादसह जिल्ह्यात ११ मार्चपासून अंशतः लाॅकडाऊन; फक्त रजिस्टर मॅरेजला परवानगी, शनिवार व रविवार कडकडीत बंद


१५ वर्षांपासून मागणी
गेल्या अनेक वर्षांपासून उस्मानाबादमध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुरु करावी अशी मागणी होत होती. त्यास आता मूर्त रुप मिळणार आहे. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना येथे वैद्यकीय शिक्षण घेता येणार आहे. त्यासाठी त्यांना पुणे, मुंबई किंवा औरंगाबादला जाण्याची गरज राहणार नाही. भाजप व शिवसेनेच्या सत्ता काळात तत्कालीन वैद्यकीय मंत्री गिरीश महाजन यांनी वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा केली होती. वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.

MPSC Exam: राज्यसेवा पूर्वपरीक्षेची तयारी सुरु; १४ मार्चला होणार परीक्षा

त्या दिशेने पाऊल उचलत अधिष्ठाता (डीन) यांची नेमणूक राज्य सरकारने केली आहे. यामुळे पुढील वर्षापासून शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुरु होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयाजवळ नवीन बिल्डिंग तयार आहे. तत्कालीन पालकमंत्री मधुकर चव्हाण यांनीही या सुविधा तयार व्हाव्यात यासाठी काम केलेले होते. गेल्या अनेक वर्षांपासून उस्मानाबादकरांची वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी होती. ती आता पूर्ण होईल.  

Edited - Ganesh Pitekar

loading image
go to top