Latur News : आरटीओ व पोलिस संयुक्त मोहीमेत पावणेचार लाखाचा दंड वसुल

शहर पोलिस ठाणे व प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय लातुर यांच्या गुरुवारी (ता. २८) रोजी आयोजित केलेल्या संयुक्त मोहीमेत वाहतुक शिस्त मोडणाऱ्या वाहनधारकांवर कार्यवाही करत एकुण तीन लाख सत्तर हजाराचा दंंड वसुल करण्यात आला आहे.
आरटीओ व पोलिस संयुक्त मोहीमेत  पावणेचार लाखाचा दंड वसुल
आरटीओ व पोलिस संयुक्त मोहीमेत पावणेचार लाखाचा दंड वसुलSakal

उदगीर, (जि.लातुर) : शहर पोलिस ठाणे व प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय लातुर यांच्या गुरुवारी (ता. २८) रोजी आयोजित केलेल्या संयुक्त मोहीमेत वाहतुक शिस्त मोडणाऱ्या वाहनधारकांवर कार्यवाही करत एकुण तीन लाख सत्तर हजाराचा दंंड वसुल करण्यात आला आहे.

गेल्या अनेक दिवसापासून शहरात बेशिस्त वाहनांची गर्दी झाली होती. शिवाजी चौक, उमा चौक, देगलूर रोड, मोंढा रोड, शाहु चौक परीसरात सातत्याने दिवसभर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता.

त्यामुळे नागरिकांनी अनेक वेळा वाहतूक कोंडी होवु नये अशी मागणी केली होती. यामुळे पोलीस व प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी संयुक्त मोहीम आखुन बेशिस्त वाहनधारकावर कारवाई करण्याची मोहीम उघडली होती.

या मोहीमेतर्गत अँटो चालक, मालक, लायसन, परमीट, पीयुशी, इन्शुरन्स, बँच, आरसीबुक व युनिफॉर्म याबाबतची तपासणी करून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५४ अँटो चालक मालकावर दंडात्मक कार्यवाही करुन त्याच्याकडुन एकुण तीन लाख सत्तर हजाराचा दंड वसुल करण्यात आल्याची माहिती शहर पोलिस निरीक्षक करण सोनकवडे यांनी दिली आहे.

उदगीर शहर व ग्रामीण भागातील वाहनधारकांना शिस्त लावण्यासाठी व त्यांनी वाहतुक नियमांचे उल्लंघन करु नये या उद्देशाने आयोजित या विशेष संंयुक मोहीमेत लातूरचे प्रादेशिक परिवहन अधिकारी सुनील खंडागळे, शितल गोसावी, अमोल सोमदे, स्वप्निल राजुरकर, पोलिस निरीक्षक सोनकवडे, वाहतुक शाखा प्रभारी अधिकारी अक्षय पाटील, अभिजित कुदळे, गजानन काळे, पुंडलिक मोहीते आदींनी पुढाकार घेतला.

पोलिस निरीक्षक सोनकवडे

सद्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहीता सुरू आहे.शिवाय लग्न समारंभ व विविध कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर वाहन चालक व मालकांनी वाहतुकीचे नियम पाळणे गरजेचे आहे. नियम मोडल्यास कार्यवाही अटळ आहे. शिवाय महिन्यातून अनेक वेळा अशा विशेष मोहीमा अनेक वेळा राबविण्यात येणार आहेत। त्यामुळे वाहनधारकांनी शिस्त पाळावी असे आवाहन शहर पोलिस निरीक्षक करण सोनकवडे यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com